भगवतीदेवी विद्यालयात मुख्याध्यापक प्रकाशराव कदमचा सत्कार

27

🔹भारतीय स्वातंत्र्य अमृतमहोत्सवी वर्षात मुख्याध्यापकपदी मिळाली पदोन्नती

✒️सिद्धार्थ दिवेकर(उमरखेड प्रतिनिधी)

उमरखेड(दि.7सप्टेंबर):-भगवतीदेवी विद्यालय, देवसरीच्या भव्य निसर्गमय प्रांगणात कार्यक्रमाला दुपारी 4 वाजता सुरुवात झाली. ह्या प्रसंगी भगवतीदेवी विद्यालयात शा.शि. पदावर01जुन 2014 ते 30मे 2022 पर्यंत कार्यरत असलेले आदरणीय श्री प्रकाशराव शामराव कदम यांची एक जून 2022 पासून ज्ञानप्रकाश शिक्षण प्रसारक मंडळ, उमरखेड अंतर्गत साईप्रकाश विद्यालय, साखरा येथे मुख्याध्यापकपदी पदोन्नती झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळेस मुख्याध्यापक प्रल्हादराव मिरासे सरांनी कदम सरांच्या कार्याबद्दल गौरवउद्गार काढले.

तर सत्काराला उत्तर देताना त्यांनी ग्रामदैवत भगवती माता यांच्या कृपाशीर्वादाने व संस्थाध्यक्ष आदरणीय श्रीमान प्रकाश पाटील देवसरकर यांनी व सर्वांच्या सहकार्यातून मला मुख्याध्यापकपद मिळाले असे त्यांनी विचार मांडले. याच विद्यालयात मला आठवर्षे सेवा करण्याची संधी मिळाली. हे माझं मी परमभाग्य समजतो. प्रत्येक सहकार्याबद्दल त्यांच्या कार्याची प्रशंसा करून सर्वांचे आभार मानले व कुशल मुख्याध्यापक श्री मिरासे सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. असे त्यांनी सत्काराला उत्तर दिले.

यावेळेस वानरेसर शेखसर शिंदेसर सुरोसेसर अल्लडवारसर सौ. कदमताई चेपुरवार अण्णा पुरी महाराज जाधव पाटील यांची उपस्थिती होती. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा प्रस्ताविक मानेसर यांनी केले. या प्रस्ताविकात मुख्याध्यापक मिरासे सरांच्या टीम मधील हे तिसरे मुख्याध्यापक आहेत असे त्यांनी सांगितले तर आभारप्रदर्शन पांडुरंग शिरफुले यांनी केले. विशेष म्हणजे सत्कारमूर्तीचे कु. आदिती वाठोरे कु. निकिता कदम व कु. दरणे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. व पसायदान घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.