जोतिबाचीवाडी येथील मनोजकुमार मुंडे, रविंद्र राऊत, नागेश यादव यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

31

✒️पुणे(पुरोगामी न्युज नेटवर्क)

पुणे(दि.7सप्टेंबर):-विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा दर्जा बरोबरच व्यक्तीमत्व विकासाचा आलेख अधिकाधिक वाढला पाहिजे हा मुलमंञ मनोमनी जपत विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी कायमच अग्रेसर असणाऱ्या जोतिबाचीवाडी येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक मनोज कुमार मुंडे सन (२०१८-१९) रविंद्र राऊत(२०२१-२२) तसेच नागेश यादव (२०२२-२३) यांना अनुक्रमे आदर्श शिक्षक पुरस्काराने भुम पंचायत समितीच्या वतीने गटविकास अधिकारी भागवत ढवळशंख, गटशिक्षणाधिकारी सुनील गायकवाड यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

शालेय विज्ञानाचे प्रयोग सुलभ भाषेत विद्यार्थ्यांना समजावून देणे,सातत्याने नवनवीन सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवणे, विद्यार्थ्यांच्या नैतिक विचारांची बाराखडी समृद्ध करण्यावर अधिक भर देत शाळेतील गुणवत्ता अधिक बळकट करणाऱ्या या शिक्षकांचे महत्वपूर्ण योगदानाची दखल घेत आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.शाळेतील मुख्याध्यापक मारुती कोकाटे सर्व शिक्षक,विद्यार्थी तसेच गावातील नागरिकांनी या पुरस्कारार्थींचे विशेष कौतुक केले.