हनुमंत साबळे यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान

36

✒️पुणे(पुरोगामी न्युज नेटवर्क)

पूणे(दि.7सप्टेंबर):-ग्रामीण भागातील मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षणाची अंमलबजावणी,ज्या वाड्यावस्त्यांवर साधं मोबाईलला नेटवर्क नव्हते अशा वस्त्यांवरील मुलांना ऑफलाईन शिकता यावे,मनोरंजक अध्ययन करता यावे तसेच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी सांस्कृतिक गुणांची मुहूर्तमेढ रोवणारे वडगाव येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक हनुमंत साबळे यांना भुम पंचायत समितीच्या वतीने तालुका स्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्कार गटविकास अधिकारी भागवत ढवळशंख,गटशिक्षणाधिकारी सुनील गायकवाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

एक उत्तम विद्यार्थी घडविणे हे शिक्षकांचे काम आहे.त्यांचे उज्ज्वल भविष्य हीच शिक्षकांच्या कार्याची पोचपावती आहे.पुरस्काराचा विचार न करता विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी कायमच प्रयत्नशील राहिले की प्रामाणिक कार्याची दखल घेतली जाते.या पुरस्काराने स्वतःवरील जबाबदारी आणखी वाढली आहे.विद्यार्थ्यांना समृद्ध बनविण्याचा हा प्रवास कायमच अखंड सुरू असेल अशी भावना शिक्षक हनुमंत साबळे यांनी व्यक्त केली.