खदानित युवकाचा मृतदेह आढळला-सिरसाळ्यातील घटना

33

✒️अतुल बडे(सिरसाळा प्रतिनिधी)

सिरसाळा(दि.7सप्टेंबर):-सिरसाळ्याची खदान दर वर्षी दोन वर्षात कुणाचा ना कुणाचा जिव घेत असतो किंवा या ठिकाणी मृत देह सापडतो. आज सायंकाळ दरम्यान एक प्रेत पोहनेर रोड येथील मालनबाई देशमुख विद्यालय समोरील खदानीत दिसुन आले. सिरसाळा पोलीसांनी हे प्रेत बाहेर काढले, प्रेत खुप सडलेल्या अवस्थेत होते.

येथील प्रल्हाद मिरगे वय २२ रा.सिरसाळा असे त्या मयताचे नाव आहे. गेल्या चार दिवसांपासून तो घरातून बेपत्ता असल्याचे समजते आहे. आज थेट प्रेत दिसुन आले. पुढील कार्यवाही सिरसाळा पोलीस प्रशासन करत आहे.