नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र भारी येथे मंजूर करा-सुदामभाऊ राठोड यांची मागणी

30

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.7सप्टेंबर):-तालुका अतिदुर्गम व आदिवासी बहुल भाग असल्याने या भागामध्ये आदिवासी बांधव व शेतकरी कष्टकरी वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे,भारी हा गाव तेलंगाणा राज्याच्या सीमेवर आहे आणि या गावालगत 12 ते 15 गाव जवळपास, जवळ-जवळ 10 ते 15 किलोमीटर च्या अंतरावर आहे आणि भारी भागातील सर्व रुग्ण पी एच सी केंद्रावर न्यावे लागते, भारी हा डोंगराळ भाग असल्याने दळणवळण सोय नसल्याने सर्वांना मोठ्या प्रमाणावर अडचणीचा सामना करावा लागतो.

एखादी गरोदर बाई असली तर त्याला थेट गडचांदूर किंवा जिवती शिवाय पर्याय नाही,म्हणून जय विदर्भ पार्टीचे नेते सुदामभाऊ राठोड यांनी तहसीलदार जिवती यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविले स्वतः लक्ष देऊन आमच्या आदिवासी बांधवांच्या शेतकरी कष्टकरी मायबापाच्या या रास्त मागणीला लक्ष देऊन आपण मंजूर करून भारी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र नव्याने ईमारत उभी करून सर्व सामान्य जनतेच्या सेवेत रुजू करून द्याल अशी विनंती सुदामभाऊ राठोड यांनी निवेदनाद्वारे केली.