अन्याय अत्याचार निवारण समितीची सभा रविवारला

31

🔹समीतीच्या पुढील वाटचाली सोबतच अनेक विषयावर होणार चर्चा

✒️कारंजा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कारंजा(घा)(दि.8सप्टेंबर):-भारतीय संविधानाच्या चौकटीत बसवून एससी, एसटी ,ओबीसी वर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला आळा घालण्यासाठी अन्याय अत्याचार निवारण समितीची कारंजा तालुका कार्यकारणी गठित करण्यात येणार आहे.या मध्ये पुरुष आघाडी,महीला आघाडी,युवक व युवती आघाडी असणार आहे त्यात वेगवेगळ्या पदावर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल.कारंजा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे रविवार दिनांक ११/९/२०२२ ला १२ वाजता या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रा.बी. टी. उरकुडे व ज्ञानेश्वर काकडे(नागपूर) हे अन्याय अत्याचार निवारण समितीची नियमावली,कार्य पद्धत व विचारधारा काय आहे या वर मार्गदर्शन करणार आहे.अन्याय अत्याचार निवारण समितीची पुढील वाटचाल व अनेक पदाधिकाऱ्यांची नियुक्ती यावेळी सभेमध्ये करण्यात येणार आहे.या सभेचे आयोजन मनोज वानखेडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले आहे. या सभेमध्ये नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन अन्याय अत्याचार निवारण समितीचे संयोजक अशोक नागले, पियूष रेवतकर, राजेन्द्र इंगळे यांनी केले.