अण्णाभाऊ साठे महामंडळाची कर्ज माफी करा!

30

🔸विश्वास मोहिते यांची ना. आठवले यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

✒️कराड(पुरोगामी न्युज नेटवर्क)

कराड(दि.8सप्टेंबर):-मातंग समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी असणाऱ्या अण्णाभाऊ साठे महामंडळाची दोन लाखापर्यंत ची कर्जमाफी करा अशी मागणी मातंग समाजाचे कार्यकर्ते विश्वास मोहिते यांनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना.रामदास आठवले यांच्याकडे केली आहे.

मातंग समाजाच्या पारंपरिक व्यवसायासाठी मातंग समाजातील कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी महामंडळाच्या शिफारशीवरून गेल्या चार वर्षांपूर्वी बँकांचे कर्ज घेतले. गेल्या दोन वर्षात कोरोना ची महामारी असल्याने आणि लॉक डाऊन मुळे सर्व व्यवसाय उद्योग बंद असल्याने मातंग समाजातील या कर्जदार व्यावसायिकाला योग्य तो अपेक्षेप्रमाणे व्यवसाय करता आला नाही, त्यामुळे त्यांची आर्थिक घडी बिघडली होती परिणामता संबंधित कर्जाची परतफेड संबंधित कर्जदाराला परतफेड करण्याची मानसिकता असतानाही परतफेड करता आली नाही. परिणामी काही बँकांची कर्ज या मातंग समाजाच्या कर्जदारांची थकबाकी दिसत आहे. त्यामुळे हे कर्जदार पुरते आर्थिक संकटात सापडलेली आहेत.

केंद्र आणि राज्य शासनाने मातंग समाजाच्या कर्जाचा डोंगर असणाऱ्या कार्यकर्त्याला या आर्थिक अडचणीतून सोडवण्यासाठी त्यांना असणारा हा कर्जाचा डोंगर बाजूला करणे गरजेचे आहे, हा सहानुभूतीपूर्वक विचार करून साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे महामंडळाची दोन लाखापर्यंत ची कर्जमाफी करण्यात यावी अशी मागणी पाडळी (केसे) तालुका कराड येथील मातंग समाजाचे कार्यकर्ते विश्वास मोहिते यांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. गेल्या काही दिवसापूर्वी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला आघाडीच्या कराड तालुक्यातील माजी पदाधिकारी बनुताई येलवे यांचे दुःखद निधन झाले होते. त्यांच्या शोकसभेसाठी केंद्रीय मंत्री ना.रामदास आठवले कराड येथे आले होते. यावेळी विश्वास मोहिते यांनी केंद्रीय मंत्री यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. यावेळी पाडळी (केसे) ग्रामपंचायतीचे सदस्य आनंदा बडेकर, ज्येष्ठ पत्रकार दिलीप महाजन, आदर्शमाता प्रतिष्ठानचे संपतराव मोहिते, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत चव्हाण, अतुल सोनावले, जब्बार मुजावर सह कार्यकर्ते उपस्थित होते.