सध्यास्थिती शेतकऱ्यांनी हवामान आधारित शेती करावी – पंजाबराव डक

27

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.9सप्टेंबर):-सध्या हवामानाचा अंदाज घेवुन शेतकऱ्यांनी शेती करावी,वॄक्ष तोड भरमसाठ झाल्याने निसर्गाचे समतोल बिघडले आहे,त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे, अशा स्थिती हवामान आधारित अचुक अंदाज घेवुन शेती व्यवसाय कडे वळणे आवश्यक आहे,तरच शेतकरी टिकेल,असे शेती विषयक सखोल मार्गदर्शन हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी रासपचे जिल्हा अध्यक्ष परमेश्वर वाघमोडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात बंगाली पिंपळा व चंकलंबा ता,गेवराई बोलताना केले.

यावेळी विचार मंचावर माजी आ, नारायणराव मुंडेरासप मराठवाडा अध्यक्ष विष्णू गोरे,दैठणचे सरपंच प्रतापभैय्या पंडीत,तसेच परिसरातील सरपंच, उपसरपंच, शिक्षक,पत्रकार,शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना पंजाबराव डक म्हणाले की,अचुक अंदाज मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला असुन निसर्गाचे लहरीपणा मुळे पाऊस वेळेवर पडत नाही,कमी जास्त पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान होत आहे,माझ्या हवामानाच्या अचुक अंदाज मुळे पिक लागवडीचे योग्य नियोजन बळीराजाने केले तर बळीराजा काळ्या मातीत सोने पिकवले, पावसाच्या अंदाज अचूक सांगण्यासाठी मी सांगतो त्या बारीक सारीक गोष्टी लक्ष दिले तर तुम्ही सुध्दा पावसाचा अंदाज बांधु शकता,सोशल मीडिया मुळे मी सांगणार हवामानचा अंदाज आपल्या प्रयत्न तात्काळ पोहचत आहे,माझ्या अचुक अंदाज ने शेती व्यवसाय केला तर नक्कीच शेतकरी सुखी होवुन कोणताच शेतकरी आत्महत्या करणार नाही,हे तुम्हाला मी कागदावर लिहून देतो,माझ्या हवामान अंदाज वर ज्यांनी ज्यांनी शेती केली त्यांना तुम्ही फोन करून विचारा असेही त्यांनी सांगितले , प्रथम प्रमुख पाहण्याचे स्वागत , सरपंच तुकाराम तळतकर,माजी उपसरपंच अशोक खरात,प्रा संजय तळतकर यांनी केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक हापटे यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संतोष भारती यांनी केले, कार्यक्रमास पंचक्रोशीतील शेतकरी, गांवकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते,

जिल्हाध्यक्ष परमेश्वर वाघमोडे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा वर्षाव
————————————
रासप जिल्हाध्यक्ष परमेश्वर वाघमोडे यांच्या वाढदिवसानिमित्त हा हवामान तज्ञ पंजाबराव डक यांच्या व्याख्यान व शेतकरी मेळाव्यात अनेक कार्यकर्त्यांनी सत्कार करत शुभेच्छा दिल्या,