प्रधानमंत्री फसल बिमा योजनेअंतर्गत फसल बिमा कार्य शाळा संपन्न

28

✒️पी.डी.पाटील(धरणगाव प्रतिनिधी)

धरणगाव(दि.16सप्टेंबर):-प्रधानमंत्री फसल बिमा योजनेअंतर्गत चिंचपूरे येथे फसल बिमा पाठशालेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये मेरी पॉलिसी मेरे हाथ अभियान या विषयी मार्गदर्शन करण्यात आले राबविण्यात आले.जळगाव जिल्हा शासकीय एग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी यांच्या संकल्पनेने
हा उपक्रम जिल्ह्यातील सर्वत्र ठिकाणी राबविण्यात येत असून दिनांक 16 सप्टेंबर रोजी चिंचपुरे येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी धरणगाव तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी श्री किरण देसले सर तसेच कृषी सहाय्यक चंद्रकांत जाधव सर,एग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी तालुका प्रतिनिधी योगेश्वर पाटील,राहुल पाटील, चिंचपुरे येथिल सरपंच कैलास पाटील,उपसरपंच गुलाब मोरे पोलिस पाटील किरण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला याप्रसंगी गावातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.