कोथाळे शाळेस आचार्य दादासाहेब दोंदे उत्कृष्ट शाळा पुरस्कार!

28

✒️नानासाहेब ननवरे(कुरुल प्रतिनिधी)

कुरुल(दि.19सप्टेंबर):-कोथाळे, तालुका मोहोळ येथील जिल्हा परिषद शाळेस ब्रह्मदेव दादा माने शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या व सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा आचार्य दादासाहेब दोंदे उत्कृष्ठ शाळा पुरस्कार माजी आमदार दिलीप माने साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या वेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे अध्यक्ष संभाजी तात्या थोरात,विस्तार अधिकारी निंबार्गी साहेब, गट शिक्षण अधिकारी जाविर साहेबजिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष मच्छिंद्रनाथ मोरे,सोलापूर जिल्हा परिषद शिक्षक सहकारी ,पतसंस्थेचे माजी चेअरमन अप्पासाहेब देशमुख, उत्तर तालुका संघाचे अध्यक्ष अनिरुद्ध पवारपतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ,संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

कोथळे शाळेने राबवलेले विविध उपक्रम, स्पर्धा परीक्षेतील यश, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, लोकसहभाग या साठी केलेलं कार्य हे पाहून शाळेची पुरस्कारासाठी निवड केली असल्याचे संयोजकांनी सांगितले.

या पुरस्काराबददल मोहोळ तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी स्वामी साहेब,विस्तार अधिकारी यादव साहेब,केंद्र प्रमुख कमळे साहेब, कामती केंद्राचे केंद्रप्रमुख कुंभार सर, राम म्हमाने सर,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सरपंच , उपसरपंच,ग्रामस्थ पालक यांनी अभिंनंदन केले आहे.हा पुरस्कार मुख्याध्यापक मधुकर जाधव सर,सहकारी शिक्षक श्री शेळके सर,श्री वसावे सर, श्री राजमाने सर,श्री भंडारे सर,श्री रणदिवे सर यांनी स्वीकारला.