मोहोळ येथे बहुजन शिक्षक महासंघाचे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक व कर्मचारी पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

30

🔹अंत्रोळी येथील पत्रकार समीर शेख बहुजन शिक्षक महासंघाच्या जिल्हास्तरीय गुणवंत पत्रकार पुरस्काराने सन्मानित…

✒️नानासाहेब ननवरे(कुरुल प्रतिनिधी)

कुरुल(दि.19सप्टेंबर):-महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे जिल्हास्तरीय गुणवंत पत्रकार, गुणवंत शिक्षक आणि गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार वितरण सोहळा गुरुनाथ मंगल कार्यालय,कुरुल रोड,मोहोळ येथे पुणे विभागाचे शिक्षक आमदार प्रा जयंत आसगावकर यांच्याहस्ते आणि महासंघाचे प्रदेशअध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

यावेळी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ.किरण लोहार,मोहोळ पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी मल्लिनाथ स्वामी,पोलीस उपनिरीक्षक केरु जाधव,महासंघाचे राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड, राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब डोळसे,राज्य संघटक प्रा.अशोक पाचकुडवे,जिल्हाध्यक्ष प्रा.युवराज भोसले,सेक्रेटरी रवी देवकर, जिल्हा उपाध्यक्ष उपप्राचार्य प्रकाश शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते.

पुरस्कार प्रदान करतेवेळी बोलताना आ जयंत आसगावकर म्हणाले की देशाची भावी पिढी घडविणाऱ्या निष्कलंक शिक्षक व कर्मचाऱ्यांना पुरस्काराने सन्मानित करून त्यांचे मनोबल वाढविले आहे.
अध्यक्षस्थानावरून बोलताना भालशंकर म्हणाले की शिक्षण प्रक्रियेतील सर्व घटकातील,सर्व जातीधर्माच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन एका धाग्यात गुंफण्याचे महनीय कार्य संघटना करीत आहे.यावेळी गटशिक्षणाधिकारी मल्लिनाथ स्वामी,केरु जाधव,सत्कार मूर्ती मुख्याध्यापिका उज्वला साळुंखे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

पुरस्कार वितरण प्रसंगी सत्कार मूर्तींचा सन्मानचिन्ह,शाल,ग्रंथ देऊन सहकुटुंब सत्कार करण्यात आला.तसेच संघटनेचे सभासद पाल्य जे नीट परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. त्यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला.

हा पुरस्कार वितरण सोहळा यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष प्रा.युवराज भोसले,जिल्हा सचिव रवी देवकर,दिव्यांग विभाग प्रमुख विजयकुमार लोंढे, जिल्हाउपाध्यक्ष प्रकाश शिंदे,प्रा.अशोक पाचकुडवे,मोहोळचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव जगताप,मुख्याध्यापक किशोर बनसोडे,उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष संग्राम कांबळे,अण्णा गवळी,संदीप निस्ताने,राजकुमार वसेकर, दत्तात्रय कसबे,मनोजकुमार खडके,राजकुमार उबाळे,शामराव गजघाटे,सुनील ससाने,विदुर शेळके,सदानंद कोळी,स्वप्नजा कसबे,शोभा चंदनशिवे,शिवाजी आवारे,सावकार कारांडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड यांनी केले, सूत्रसंचालन जिल्हा अध्यक्ष प्रा युवराज भोसले आणि शोभा चंदनशिवे यांनी केले तर प्रा अशोक पाचकूडवे यांनी सर्वांचे आभार मानले.

चौकट…
पुरस्कार प्राप्त मानकरी पुढिल प्रमाणे ;

पंढरपूर येथील अखंड न्यूज चॅनलचे संपादिका प्राध्यापिका सुरेखा भालेराव,बहुजन आवाज न्यूज चॅनलचे वृत्तसंपादक समीर शेख यांना विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर गुणवंत पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्राचार्या उज्ज्वला साळुंखे – सुरवसे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,सोलापूर,प्राचार्या रंजना निंबाळकर (बॅ.बाबासाहेब भोसले प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय,कासेगांव, ता.द.सोलापूर,गीतांजली शिंदे (सहशिक्षिका), जिव्हाळा सुसंस्कार विद्यामंदिर,कुर्डुवाडी, ता.माढा यांना क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मुख्याध्यापक अविनाश गायकवाड,माध्यमिक प्रशालापडसाळी,ता.उ.सोलापूर,मुख्याध्यापक महादेव कांबळे- विद्या विकास मंडळाचे प्राथमिक विद्यालय,पंढरपूर, सहशिक्षक अमोल निकाळजे,शिवप्रभा प्राथमिक विद्यामंदिर,रुई,ता.बार्शी,सहशिक्षक सावकार कारंडे,मा.आ.राजनजी पाटील विद्यालय मलिकपेठ,ता.मोहोळ,सहशिक्षकगिरजाप्पा चौगुले,बाळकृष्णविद्यालय, नंदेश्वर, ता. मंगळवेढा यांना क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मुख्य लिपिक लक्ष्मण बेहेरे,न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला,वरिष्ट लिपिक जयंत शिरसकर,भारत हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,जेऊर,ता.करमाळा,लिपिक सूर्यकांत लोंढे,प्रतापसिंह विद्यालय, चांदापुरी, ता.माळशिरस, नाईक आसिफ कंदलगावकर, मंद्रूप माध्यमिक विद्यालय, मंद्रुप, ता.द.सोलापूर,सेवक नंदकुमार कदम,जगदंबा विद्यालय, पोखरापूर,ता.मोहोळ राजर्षी शाहू महाराज गुणवंत कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.