राज्यव्यापी पेंशन बाईक रॅलीत पुरोगामी समितीचा सक्रिय सहभाग

    47

    ?पुरोगामी शिलेदारांनी रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन

    निवृत्तीनंतर पेंशन हा संविधानिक हक्क असून नोव्हेंबर२००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांची पेंशन बंद करून शासनाने अन्यायी परिभाषित अंशदान योजना आणली . त्यामुळे कित्येक मृत कर्मचाऱ्यांचे संसार उघड्यावर आले आहेत . ५८ व्या वर्षापर्यंत सेवा देणाऱ्याची थोर थट्टा करीत ५ वर्षे काम करणाऱ्या आमदार-खासदारांना अमाप पेंशन दिली जाते . हा विरोधाभास म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राची व्यथाच म्हणावी लागेल .

    – *किशोर आनंदवार , जिल्हा अध्यक्ष*
    —————————————-

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)

    चंद्रपूर(दि.20सप्टेंबर):- महाराष्ट्र राज्य पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना १नोव्हेंबर २००५नंतर सेवेत रुजू कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन मिळावी यासाठी खंबीरपणे लढा देत आहे . त्यासाठी निवेदने , मोर्चे व आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधत आलेली आहे . ५८ व्या वर्षापर्यंत सेवा दिल्यानंतर जुनी पेंशन ही म्हातारपणाची काठी व कुटुंबाचा आधार असल्याने झारखंड , राजस्थानसारख्या राज्यांनी पेंशन योजना लागू केली . नुकतेच पंजाब राज्याने याबाबत सकारात्मक निर्णय घेतले पण पुरोगामीत्व लाभलेल्या व आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या महाराष्ट्र शासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे .

    म्हणूनच शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी व जुनी पेंशन लागू करावी ही मागणी घेऊन २१ सप्टेंबर २०२२ ला राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना राज्यव्यापी पेंशन बाईक रॅली काढत आहे .या बाईक रॅलीला महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचा केवळ पाठींबा नसून सक्रिय सहभाग असल्याची माहिती प्रसिद्धीप्रमुख लक्ष्मण खोब्रागडे यांनी दिली आहे.

    २१ सप्टेंबर च्या राज्यव्यापी पेंशन बाईक रॅलीत जास्तीत जास्त पुरोगामी शिलेदारांनी सहभाग घेण्याचे आवाहन पुरोगामी समितीचे राज्यनेते विजय भोगेकर, राज्य सरचिटणीस हरीश ससनकर, राज्याध्यक्ष महिला मंच अल्का ठाकरे, राज्यसचिव निखिल तांबोळी ,जिल्हा प्रमुख सल्लागार दिपक व-हेकर, जिल्हा नेता नारायण कांबळे, जिल्हाध्यक्ष किशोर आनंदवार, जिल्हा सरचिटणीस संजय चिडे, जिल्हा कार्याध्यक्ष गंगाधर बोढे, जिल्हा कोषाध्यक्ष सुनिल कोहपरे, कार्यालयीन सचिव सुरेश गिलोरकर जिल्हा उपाध्यक्ष मोरेश्वर बोंडे,रवि सोयाम, सुधाकर कन्नाके, लोमेश येलमुले, विलास मोरे , जिल्हा नेता महिला मंच सुनिता इटनकर, महिला मंच अध्यक्ष विद्या खटी, सरचिटणीस पौर्णिमा मेहरकुरे, कार्याध्यक्ष सिंधु गोवर्धन, कोषाध्यक्ष लता मडावी, उपाध्यक्ष पुनम सोरते, सुलक्षणा क्षिरसागर, सहसचिव दुष्यंत मत्ते, प्रमुख संघटक नरेश बोरीकर, प्रमुख संघटक ज्ञानदेवी वानखेडे यांनी एक निवेदनातून केले आहे .