

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
बीड(दि.20सप्टेंबर):-राज्यातील जवळपास २७ जिल्ह्यांमध्ये लंम्पि स्किनचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहेत.राज्यातील जळगाव, अहमदनगर, धुळे, अकोला, पुणे, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलडाणा, अमरावती, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, यवतमाळ, परभणी, सोलापूर, वाशिम, नाशिक, जालना, पालघर, ठाणे, नांदेड, नागपूर, चंद्रपूर, हिंगोली व रायगड अशा 27 जिल्ह्यांमध्ये हा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालं असून जनावरांवर लसीकरण मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. आत्तापर्यंत 3 हजार 291 जनावरे औषधोपचारामुळं बारी झाली आहेत. अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली आहे. त्यातच राज्याला आता पर्यंत २५ लाख लसमात्रा प्राप्त होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यातील जळगाव, अहमदनगर, धुळे, अकोला, पुणे, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलडाणा, अमरावती, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, यवतमाळ, परभणी, सोलापूर, वाशिम, नाशिक, जालना, पालघर, ठाणे, नांदेड, नागपूर, चंद्रपूर, हिंगोली व रायगड अशा 27 जिल्ह्यांमधील 1 हजार 108 गावांमध्ये 9 हजार 375 जनावरांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. या बाधितांपैकी 3 हजार 291 जनावरे बरी झाली आहेत.
याच बरोबर बाधित जिल्ह्यातील जळगांव ९४, अहमदनगर ३०, धुळे ९ , अकोला ४६, पुणे २२, लातूर ३, औरंगाबाद ५, सातारा १२, बुलडाणा १३, अमरावती १७, कोल्हापूर ९, सांगली २, वाशिम १, जालना १, ठाणे ३, नागपूर ३ व रायगड १ अशा एकूण २७१ जनावरांचा आत्तापर्यंत मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.