महाराष्ट्र जागृत जनमंच

33

हे नैतिक व्यासपीठ आहे. या संघटनेच्या जिल्हा स्तरावर संघटना आहेत.जळगांव जिल्हा जागृत जनमंच,धुळे जिल्हा जागृत जनमंच याप्रमाणे.

१) समाजकारण, प्रशासन,राजकारण हेच तीन विषय हाताळतो.धर्म,जात किंवा अर्थ विषयावर वेळ घालवत नाही.
२)सरकारचे कायदे,नियम यांच्या समांतर किंवा त्याच आधारावर काम करतो.नवीन धोरणात्मक निर्णय साठी वेळ वाया घालवत नाही.आरक्षण द्या.अमुक द्या वगैरे.ते काम विधानसभा व विधान लोकसभेचे आहे.
३)यात अधिकतम उच्चशिक्षित,अभिजात, स्वयंसेवी, प्रस्थापित लोक आहेत. बुद्धीमान , उच्चशिक्षित,व्यवसायिक लोक आहेत.डॉक्टर, इंजिनिअर, प्रोफेसर, वकील,व्यापारी, जेष्ठ नागरिक.
४)यातील सदस्य गृहस्थामात स्थिर आहेत.वैवाहिक, कौटुंबिक, सामाजिक चौकटीत जगणारे.
५) यातील लोक उदरनिर्वाहासाठी निश्चिंत आहेत.आर्थिक विवंचना नसलेली.
६)यातील लोक सरकारकडे याचक नाहीत.अत्यावश्यक तितकेच सरकारवर अवलंबून असणे.
७) जनमंच सदस्यांकडून पैसा जमा करीत नाहीत.किंवा कोणा त्रस्त किंवा त्रयस्थ कडून मागत नाहीत.सुविधा साधने घेतो.दुसऱ्याचा पैसा माझ्या खिशात आला कि मी बिघडतो.ही संकल्पना आहे.
८)संघटनेत येताना,काम करतांना कोणीही कोणाच्या खांद्यावर बसत नाही.वारकरी सारखे,दांडी यात्रा सारखे स्वयंचलित असतात.
९)ही संघटना रजिस्टर नाही. पदे वगैरे फॉर्मल आहेत.त्यामुळे अधिकाराचा,वर्चस्वाचा वाद होत नाही.
१०) सदस्यांपैकी ज्याला विषय आवडत नसेल तर ते अनुपस्थित राहून शकता.मनावर दडपण नको.
११) सदस्य कोणत्याही पक्षाकडून किंवा अपक्ष निवडणूक लढू शकतात.एकमेकांना बौद्धिक, कायिक,वाचिक सहकार्य करतो.
१२) जिल्ह्यातील तालुकानिहाय संघटना बनवून काम करू शकते.स्थानिक समस्यांवर काम करू शकते.त्यामुळे एकाचे विचार दुसऱ्यावर थोपवणे किंवा विचारांची गळचेपी होत नाही.
१३) संघटनेच्या बैठका,सभा कोणीही सदस्य आयोजित करतो.कोणावरही तशी सक्ती नाही.
१४) स्वतंत्र माणूस,स्थिर जीवन, मुक्त विचार,स्वयंप्रेरीत कार्य अशी संकल्पना आहे.

महाराष्ट्र, जळगाव,धुळे हे स्थळ वाचक शब्द आहेत.जागृत हे सदस्याचे विशेषण आहे.जनमंच हा समूहवाचक शब्द आहे.प्राचीन किंवा आधुनिक धर्म, संप्रदाय,पक्ष याच तत्वावर निर्माण झाल्या आहेत.स्वतंत्र माणूस, मुक्त विचार, स्थिर जीवन,स्वयंप्रेरीत कार्य हेच तत्त्व.
सर्वे सुखेन संतु! सर्वे भद्रानि पश्यंतु!!
हाच हेतू.

✒️शिवराम पाटील(९२७०९६३१२२)महाराष्ट्र जागृत जनमंच,जळगाव