राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत कदम प्रथम, तर राऊत दृतीय

33

🔸राज्यातून १४५ स्पर्धकांचा सहभाग

✒️वर्धा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

वर्धा(दि.22सप्टेंबर):- प्रबोधनकार ठाकरे व पेरियार रामासामी यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने राज्यस्तरीय ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा जनकल्याण फाउंडेशन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा युवा सामाजिक कार्यकर्ते पियुष रेवतकर यांच्या नेतृत्वात घेण्यात आली होती. त्या प्रश्न मंजुषा स्पर्धेमध्ये प्रबोधनकार ठाकरे यांचे पुरावे, पेरियार यांच्या द्रविड कडगम आंदोलन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशासाठी योगदान, महात्मा फुले यांचे साहित्य, शाहू महाराजांचा इतिहास ,सामाजिक कार्य व स्त्री शिक्षण चळवळ, भारतीय संविधान, इतर महापुरुष व सामान्य-ज्ञान या विषयावर प्रश्न होते. या स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय तीन बक्षिसे ठेवण्यात आली होती. रोख रक्कम, पुस्तकांचा संच बक्षिस म्हणून दिला जाणार आहे.

प्रत्येक सहभागी स्पर्धकास ई- सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून १४५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.स्पर्धकांना ६० मिनीट मध्ये १०० प्रश्न सोडवायचे होते.२० सप्टेंबर ला ही स्पर्धा ऑनलाईन द्वारे संपन्न झाली. या स्पर्धे मध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून 1४५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता .स्पर्धेत नागपूर येथील आदेश कदम प्रथम,दृतीय बक्षिस सोलापूर येथील यश राऊत यांनी तर तृतीय बक्षिस सेलू येथील रोहन सोमकुवर यांनी प्राप्त केले .२५ सप्टेंबर रोजी जनकल्याण फाउंडेशन चे प्रदेश अध्यक्ष पियुष रेवतकर यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात येईल .