राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्यावतीने बीड जिल्हास्तरीय पुरस्कारांचे आयोजित -माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार लोकरत्न पुरस्कारांचे वितरण

15

✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)

बीड(दि.24सप्टेंबर):- जिल्हास्तरीय लोक रत्न पुरस्कार विविध क्षेत्रातील मान्यवरांना देणार..!

1)आदर्श शिक्षक लोकरत्न पुरस्कार
2)आदर्श पत्रकार लोकरत्न पुरस्कार
3)आदर्श शेतकरी लोकरत्न पुरस्कार
4)आदर्श डॉक्टर लोकरत्न पुरस्कार
5) आदर्श स्वतंत्र सेनानी लोकरत्न पुरस्कार
6)आदर्श कलाकार लोकरत्न पुरस्कार
7)आदर्श खेळाडू लोकरत्न पुरस्कार
8)आदर्श समाजसेवक लोकरत्न पुरस्कार
9)आदर्श उद्योजक लोकरत्न पुरस्कार
10)आदर्श कोविड योद्धा लोकरत्न पुरस्कार
11)आदर्श प्राध्यापक लोकरत्न पुरस्कार
15)आदर्श प्रशासकीय सेवा लोकरत्न पुरस्कार
16)आदर्श प्राणी मित्र लोकरत्न पुरस्कार
17)आदर्श सरपंच लोकरत्न पुरस्कार
18)आदर्श बँक अधिकारी, कर्मचारी लोकरत्न पुरस्कार
19)आदर्श राजकारणी लोकरत्न पुरस्कार
20)आदर्श पोलिस अधिकारी, कर्मचारी लोकरत्न पुरस्कार .
___
बीड (प्रतिनिधी) राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्यावतीने बीड जिल्हास्तरीय पुरस्कारांचे बीड जिल्हाचे माजी पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे. राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश संघटक तथा दै. युवतीराजचे मुख्य संपादक,श्री. भागवत वैद्य यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली.

वैद्य म्हणाले की, या कार्यक्रमास बीड जिल्ह्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे, राज्यसभेच्या खासदार सौ. रंजनीताई अशोकराव पाटील, बीड तालुक्याचे आमदारसंदीप क्षीरसागर, बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शर्मा, बीड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक राठोड, बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळ, बीड नगर पालिका सी. ओ. यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड जिल्हास्तरीय आदर्श लोकरत्न सन्मान पुरस्कार 2921- 2022 शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, क्रीडा, पत्रकारिता, सांस्कृतिक, कला, वैद्यकीय, प्रशासन, प्रशासकीय, कृषी, आर्थिक वरील सामाजिक क्षेत्रात ज्यांनी ज्यांनी, उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सन्मानित करण्यात येणार आहे.

पुरोगामी पत्रकार संघ व कुंभार समाज संघटना सालाबाद प्रमाणे पद्मश्री, पद्मभूषण डॉ. रत्ना आप्पा कुंभार यांच्या जयंतनिमित्त लोकरत्न पुरस्कार वितरण व विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात येत असतो. यंदाच्या सोहळ्यास खूप छान कार्य केलेले व्यक्तींचा लोकरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तरी दिनांक 5 ऑक्टोंबर 2022 पर्यंत लोक रत्न पुरस्कार करीता प्रस्ताव पाठवावे. सामाजिक उपक्रम, विविध विभागात ज्यांनी ज्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. अश्या व्यक्तीने आपला बायो डाटा व बीड जिल्ह्यातील पत्रकार यांच्या पाल्याने विविध शिक्षण विभागात बोर्डात, विद्यापीठात 80 टक्के च्या वरती मार्क घेतले असेल अश्या विद्यार्थ्यांनी आपले मार्क मेमो झेरॉक्स खाली दिलेल्या नंबर वर पाठवावे. भागवत वैद्य बीड जिल्हा प्रतिनिधी दैनिक महाभारत व प्रदेश संघटक पुरोगामी पत्रकार संघ मो.9075887328 (व्हॉटसअप), ई मेल yuvatirajbeed@gmail.com यावर पाठवावे. असे आव्हान भागवत वैद्य यांनी केले आहे.

संघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशध्यक्ष विजयकुमार वाव्हाळ, राज्य कार्याध्यक्ष प्रा. दशरथ रोडे, राज्य संघटक डॉ. गोपाळराव लाड, महाराष्ट्र राज्य अन्याय अत्याचार निवारण समितीच्या राज्य उपाध्यक्षा सौ. मिराताई काळे, उपाध्यक्ष – स.का. पाटेकर, सौ. सुनंदा केदार, मराठवाडा अध्यक्षा शकिला पठाण, महाराष्ट्र राशन हक्क समितीचे मराठवाडा अध्यक्ष चंद्रकांत कांबळे, बीड जिल्हाध्यक्ष – स्वाती खुळे, (अन्याय अत्याचार समिती) उपाध्यक्ष – स.का. पाटेकर, सौ. सुनंदा केदार, , बीड जिल्हाध्यक्ष – उत्तम ओव्हाळ, जिल्हा कार्याध्यक्ष राजकूमार धिवार , जिल्हा सचिव पृथ्वीराज निर्मळ, बीड जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय नरनाळे, सय्यद अडसर, शेख हरून, जिल्हाध्यक्ष. शेख तालेब, अमर शेख, जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष , शहर अध्यक्ष, संघाची सर्व सभासद व पत्रकार या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे महाराष्ट्र राज्य पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य संघटक भागवत वैद्य यांनी आवाहन केले आहे.