भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेचा प्रश्न मार्गी लावनार- मंत्री अतुल सावे

105

🔸महात्मा फुले यांनी सुरु केलेल्या भारतातील पहिली मुलींची शाळा भिडे वाडा संवर्धन व पुनर्निर्माणाकरीता अखिल भारतीय श्री संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र भूषन लोकनेते सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी सहकार मंत्री अतुलजी सावेंना घातले साकडे

✒️नगर(पुरोगामी न्युज नेटवर्क)

नगर(दि.25सप्टेंबर):- महाराष्ट्र राज्याचे सहकार,इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री नामदार अतुलजी सावे साहेब २४ सप्टेंबर रोजी नगरला आले असता महात्मा फुलेंनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाज स्थापना दिनाचे औचित्य साधुन श्री संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र भूषन लोकनेते सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी त्यांची आवर्जुन भेट घेतली, व महात्मा फुले यांनी सुरु केलेल्या भारतातील पहिली मुलींची शाळा भिडे वाडा संवर्धन व पुनर्निर्माणाकरीता मंत्र्यांना साकडे घातले.

स्त्री-पुरुष असमानता काढून टाकून स्त्रीशिक्षणाचा पाया रचणारे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथे भिडेच्या वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली व शिक्षणाची महाद्वारे स्त्रियांकरता मुक्त केली. व आशिया खंडात पहिले क्रांतीचे पाऊल टाकले. शिक्षण क्षेत्रासह सामाजिक क्रांतीचे जनक म्हणून त्यांना इतिहासाने संबोधले यासह अनाथ आश्रम, विधवा आश्रम, महिला सबलीकरण, अस्पृशता निर्मुलन, युवक कल्याण, अन्नछत्र, उद्योग क्षेत्र साहित्य धर्मांध शक्तीच्या उन्मादाला ठेचून काढण्याचे काम करून अंधश्रध्दा निर्मुलन, समाज विधायक कार्य केले. महात्मा फुले यांनी देशात शिक्षणाची ज्योत पेटवून राष्ट्राला नवी दिशा दिली.

ज्या काळात महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता अश्या काळात स्रियांसाठी शाळा सुरु करून खऱ्या अर्थाने महिलांची गुलामी संपविली आणि समग्र स्त्रीजातीच्या स्वातंत्र्याची नवी पहाट झाली अशी पवित्र वास्तू म्हणजे पहिली मुलींची शाळा जिर्ण होऊन कोसळत आहे. हा अखंड स्त्री जातीचा अपमान आहे तसेच महाराष्ट्र राज्याची प्रतिमा मलीन होत आहे. श्री संत सावता माळी युवक संघाच्या वतीने गेल्या १७ वर्षांपासुन महाराष्ट्राबरोबरच ईतर राज्यांतही वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने केली गेली जसे उपोषण, रास्तारोको,जेलभरो आंदोलन,मोर्चे, धरणे आंदोलने, हजारो निवेदने, मशाल मोर्चे काढले, यांनतर महाराष्ट्र सरकारने सदर शाळेला अतिशय तुटपुंजा निधी फक्त १५ कोटी निधी दिला परंतु अद्याप हि कुठल्याही कामाला त्याठिकाणी सुरुवात झाली नाही.

तरी सदर वास्तू साठी भरघोस निधी मंजूर करून या जागेचे Compulsory Acquisition करून त्याठिकाणी शाळा सुरु करुन देशातील समस्त महिला भगिनींना न्याय द्यावा,अशी मागणी अखिल भारतीय श्री संत सावता माळी युवक संघाच्या वतीने संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र भूषन लोकनेते सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी केली.यावेळी नगर येथील भाजपाचे जेष्ठ नेते अभयजी आगरकर,संघटनेचे नगर तालुकासल्लागार लवेश गोंधळे,तालुकाध्यक्ष सागर खरपुडे,दत्तात्रय जाधव,धिरज खेतमाळीस,किरण बनकर,विजय दळवी,आदी संघटनेचे शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.