रासेयो स्वयंसेवकांनी समाजदूत म्हणून कार्य करावे – डॉ डी. एच गहाणे

33

🔹प्राचार्य नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय ब्रम्हपुरी येथिल राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त आयोजित अध्यक्षीय मार्गदर्शन करत असलेले प्रतिपादन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.24सप्टेंबर):-राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी समाजातील वाईट प्रथेचे बिमोड करावे व आदर्श समाजबांधणी करिता विधायक व रचनात्मक कार्य करण्यासाठी पुढे येण्याची खरी गरज आहे. हे स्वप्न परमपुज्य महात्मा गांधी यांचे होते. भारत देशातील युवकांमध्ये देश भक्ती व राष्ट्र प्रेम जागृत करून देशाचे हितसंरक्षण होण्यासाठी महाविद्यालयीन युवकांमध्ये समाजसेवेचे बीज निर्माण करणे आवश्यक आहे ही तळमळ महात्मा गांधी यांची होती याच उद्देशाने राष्ट्रीय सेवा योजना या क्रियाशील उपक्रमाची देशाच्या विद्यापठात निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे महापुरुषांचे स्वप्न साकार करण्याकरिता समाज सेवेचे व्रत स्वीकारून रासेयो स्वयंसेवकांनी समाजदूत म्हणून कार्य करावे असे डॉ डी एच गहाणे यांनी राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय ब्रम्हपुरी येथिल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानारून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना प्रतिपादन केले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ सुभाष शेकोकार शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख , डॉ आर के डांगे कला विभाग प्रमुख , डॉ भाष्कर लेनगुरे , डॉ प्रकाश वट्टी रासेयो विभागिय समन्वयक गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, डॉ किशोर नाकतोडे आयक्युऐसी कोआडनेटर , रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ विवेक नागभिडकर,व प्रा अभिमन्यू पवार हे उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ सुभाष शेकोकार यांनी रासेयो स्वयंसेवकांनी देशाला महासत्ता बनविण्यासाठी सक्षम समाज निर्मितीची गरज आहे रासेयो स्वयंसेवक हा तरूण आहे त्यांनी सृजनशील कार्य करावे असे मत व्यक्त केले तर डॉ आर के डांगे यांनी राष्ट्रीय सेवा योजना दिनाचे औचित्य साधून समाजसेवा करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो हे महाविद्यालयाकरिता गौरवाची बाब आहे. असे विचार मांडले तसेच डॉ भास्कर लेनगुरे यांनी राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारे व्यासपीठ आहे असे सूतवाच केले तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उदेश डॉ प्रकाश वट्टी यांनी समाजावून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. आचल करंबे हीने तर आभार प्राजक्ता विखार हीने मानले या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित डॉ रेखा मेश्राम, डॉ के के शर्मा, डॉ धनराज खानोरकर, डॉ युवराज मेश्राम, डॉ मोहन कापगते प्रा वर्षा चंदनशिवे, डॉ अजित खाजगीवाले, डॉ राजू आदे, डॉ पद्माकर वानखडे हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रासेयो स्वयंसेवक गणेश धनजुडे, कृणाल करंबे, सौरभ,व सुरज मेश्राम आणि सर्व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.