

✒️गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क)
गडचिरोली(7 जुलै):- गडचिरोली येथील कृषी महाविद्यालयात विलगीकरणात असलेल्या सीआरपीएफ बटालियन ११३ मधील ५ जवानांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह मिळाले आहेत. यामध्ये उत्तर प्रदेश-२, आन्ध्र प्रदेश-१, कुरखेडा-१, औरंगाबाद-१ येथील जवानांचा समावेश आहे.
यामुळे जिल्ह्यातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या ५३ झाली. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण ६२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या ११६ झाली आहे. गडचिरोलीत असलेल्या एकुण सर्व ६१ रुग्णांवर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरु आहेत. यामध्ये ८ जिल्ह्याबाहेरील आहेत.
उपाचार सुरु असलेले ठिकाण:-
जिल्हा सामान्य रुग्णालय, गड. – ५१
कोरोना कोविड सेंटर, वडसा- ४
न्यू इंग्लिश स्कूल, सेमाना रोड, गड.- ५
नागपूर जीएमसी- १