बागपिंपळगाव येथे “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियानांतर्गत महिलांची तपासणी

30

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.28सप्टेंबर):-सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने
नवरात्र उत्सव निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व माता-भगिनींसाठी दि.२६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” या अभियानांतर्गत उपकेंद्र बाग पिंपळगाव येथे मंगळवार दि.२७ सप्टेंबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गरोदर माता, किशोरवयीन मुली या सह उपस्थित सर्व महिलांच्या BP, Sugar, HB, BMI, VIA Test इत्यादी तपासण्या करण्यात आल्या.

गरोदर माता व महिलांच्या सुरक्षित आरोग्य व अडचणी दूर करण्यासाठी या वर्षी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियानास मंगळवार पासून सुरुवात झाली असून तालुक्यातील बागपिंपळगाव येथे या अभियानास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान यावेळी Cervical Cancer & Breast Cancer इत्यादी आजाराची माहिती देवून चे महिलांना व्यवस्थित समुपदेशन करण्यात आले. यावेळी डॉ रचना शेळके,बोराडे सिस्टर, साळवे ब्रदर, गटप्रवर्तक रोहिणी डोंगरे, सोनाली पटेकर, लंका टुले आशाताई उपस्थित होत्या.