दोन तीन वर्ष कोरोनात गेली ,पण केळी या पिकाने पैसे मिळवून दिले

66

🔸माळखंबीच्या भांगे यांच्या केळीला सर्वाधिक दर मिळाला

✒️नानासाहेब ननवरे(कुरुल प्रतिनिधी)

कुरुल(दि.28सप्टेंबर):-अगोदरच निसर्गाच्या अवकूर्पेमुळे व दोन वर्षाच्या कोरोना मुळे शेतकऱ्यांनी पीकवलेल्या कोणत्याच मालाला मनावा असा भाव मिळाला नाही ,कोरोना मद्ये तर केळी पिकावणाऱ्या शेतकऱ्यानी कोरोना काळात शेतातील केळी तोडून टाकली दोन ते तीन रु किलो या दराने सुद्धा व्यापारी केळी नेहत नव्हते ,या अगोदर केळीला साधारण 18ते 20 रु जाणारी केळी लोकडावून च्या काळात 2ते 3रु सुध्या व्यापरी घेण्यास तयार नव्हते त्यामुळे केळी चे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यां चे अतोनात नुकसान झाले त्यामुळे शेतकरी निराशा झाली होती.

पण यंदा मात्र केळीने चांगलाच भाव खाला आहे माळखंबी ता माळशिरस येतील सागर भांगे व किरण भांगे या बांधूनी पुन्हा एकदा धाडस दाखवत चोख नियोजन व अतिशय मेहनत घेऊन केळी चे पिक घेतले भांगे बधूनी पावणे तीन एकरात केळी ची 7 बाय 4 या अंतरावर केळीची लागवड ठिबक सिंचन वर केली ,रासायनिक खताबरोबर सेंदर्य खाताचाही वापर केला साधारणपणे केळी 14ते 15 महिन्यांनी तोडणीस येते परेंतु भांगे यांची केळी पीक नऊ ते साडेनऊ महिन्यात तोडणी योग्य झाले त्यांना 27ते 30रु प्रति किलो दरा मिळाला ,आज परेंतचा उच्चकी दर आहे .

भांगे बांधूना केळी पिकातून 27ते 28 लाख रु उत्पन्न अपेक्षित आहे अन ते मिळालेही म्हणजे एकरी 10 लाखा रु उत्पन्न मिळेले आहे.कोरोना काळात केळी पिकास दर न मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी यंदा केळी पीक घेतले नव्हते पण ज्या शेकऱ्यांनी पीक घेतले त्यांना चांगला दर मिळाला यातच .भांगे बांधूनी मागील वर्षी नुकसान होऊन ही न दगमगता पुन्हा नव्या धाडसाने जोमाने केळी पीक घेतले व मालामाल झाले ,