आरपीआय आठवले नाशिक महानगर प्रमुख पदी नारायण गायकवाड

26

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.29सप्टेंबर):- नाशिक महापालिका व येणाऱ्या निवडणूक लक्षात घेऊन तसेच पक्षाची ताकद वाढविण्यासाठी नाशिकमध्ये गंगापूर रोड बिग सिटी हॉटेल मध्ये रिपब्लिकन आठवल़े गट पक्षाचा भव्य मेळावा आज आयोजित करण्यात आला. यावेळी आरपीआय चे केंद्रीय निरीक्षक व कायदेशीर सल्लागार बी. के. बर्वे तसेच केंद्रीय निरीक्षक कांबळे व नाशिक जिल्हाप्रमुख प्रकाश लोंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत नारायण गायकवाड यांची ‘ नाशिक महानगर प्रमुख ‘ पदी निवड करण्यात आली.

यावेळी महिला जिल्हाध्यक्ष मनाली जाधव, गटनेत्या दिक्षाताई लोंढे, महिला उत्तर महानगर प्रमुख नैना सुनील वाघ , अशोक पाटील, प्रशांत कर्पे, अजय सोनवणे, सुभाष पिंगळे, कुणाल चांदवडकर , अनिल नेरकर आदि मान्यवर व प्रमुख पदाधिकारी व नविन निवड झालेले नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.