कारंजा येथे नवरात्रीनिमित्त शैक्षणिक वस्तूंचे वाटप

56

🔹सहेली महीला मंचाचा उपक्रम

✒️कारंजा घाडगे,प्रतिनिधी(पियूष रेवतकर)

कारंजा(घा)(दि.30सप्टेंबर):-नवरात्री निमित्त कारंजा शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.त्यात सहेली महिला मंचतर्फे नवरात्री निमित्त कस्तुरबा विद्यालय तसेच केंद्र शाळा,जयस्तंभ चौक,जिल्हा परिषद शाळा येथील गरजू आणि होतकरू मुलांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात येऊन समाजासमोर एक आदर्श कार्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला.आपण नवरात्रात धार्मिक कार्यासाठी सढल हाताने मदत करतो.अश्या गरजू विद्यार्थ्यांना आपण जर शैक्षणिक कार्यात मदत केली तर नक्कीच त्यांनां हातभार होईल,हाच या कार्यक्रम घेण्यामागे प्रामाणिक प्रयत्न सर्व सखिंच्या मदतीने संयोजिका माधुरी जसुतकर यांनी केलेला आहे.

तसेच पतीच्या निधनानंतर सासू,दोन मुले,स्वतःचे आई,वडील यांचा सांभाळ स्वबळावर अतिशय खंबीरपणे करणाऱ्या सखी सरिता वलगावकर यांचा देखील सत्कार नवरात्री निमित्त करून स्त्री शक्तीचा जागर करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सविता भांडवलकर , चित्रा काळे,श्रद्धा भुयार,होमेश्वरी पठाडे, सुवर्णा चौधरी,मृणालिनी टूले,निता मिश्रा,सुनीता राठी,कविता मस्के, संध्या उपाध्ये,संगीता मांडवकर,भरती पालीवाल,रजनी धांदे,वनिता चाफले,अश्विनी चाफले या सर्व सखीनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.।