ऊसतोड कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी मानवी हक्क अभियान आणि कर्मवीर एकनाथ आवाड ऊसतोड कामगार संघटनेचे तहसीलदार यांना निवेदन

36

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)

गेवराई(दि.5ऑक्टोबर):- तहसील येथे खेरडा घाटामध्ये (अंबाजोगाई) ऊसतोड कामगाराच्या संदर्भात घडलेल्या घटनेच्या संदर्भामध्ये निवेदन देण्यात आले. यामध्ये लहान मुलाचा मृत्यू झालेला आहे आणि दहा जण जखमी आहेत. मयताच्या कुटुंबाला पंचवीस लाख आणि जखमींना दहा लाख रुपये देण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री आणि सामाजिक न्याय मंत्री यांना मानवी हक्क अभियान आणि कर्मवीर एकनाथ आवाड संघटनेच्या माध्यमातून करत आहेत. दरवर्षी बीड जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने ऊसतोड कामगार बाहेर जिल्ह्यात बाहेर राज्यात जात असतात पण ऊसतोड कामगार ऊस तोडणी करण्यासाठी गेल्यावर त्यांच्यावर अन्याय अत्याचार, मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न, त्यांच्या आरोग्याच्या प्रश्न अशा अनेक बाबी पासून ते वंचित असतात.

त्यांना कुठल्याही योजनेचा लाभ मिळत नाही म्हणून राज्य शासनाने ऊसतोड कामगाराची दखल घेऊन त्यांना घरकुल असतील त्यांच्या मुलांचा शाळेच्या प्रश्न असेल, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न पासून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा अशी आज दिलेल्या निवेदनातून मानवी हक्क अभियान आणि कर्मवीर एकनाथ आव्हाड ऊसतोड कामगार संघटनेची मागणी आहे. यावेळी या वेळी मानवी हक्क अभियानाचे तालुकाध्यक्ष धोंडिबा हतागळे, कर्मवीर एकनाथ आवाड ऊसतोड कामगार संघटना तालुका अध्यक्ष मारोती भिसे, सामाजिक कार्यकर्ते धम्मा त्रिभुवन, सामाजिक कार्यकर्ते रमेश हातागळे, सामाजिक कार्यकर्ते विशाल उमप आधी उपस्थित होते.