खाली जमीन, वर आकाश – एक विमर्शचे शुक्रवारी प्रकाशन

31

✒️कोल्हापूर(पुरोगामी न्युज नेटवर्क)

कोल्हापूर(दि.6ऑक्टोबर):- ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी खाली जमीन, वर आकाश या त्यांच्या आत्मचरित्रातून स्वतः च्या जीवनाची करुण कहाणी मांडली आहे. या डॉ. लवटे यांच्या ग्रंथाच्या अनुषंगाने ज्येष्ठ लेखक डॉ. राजेखान शानेदिवाण यांनी समीक्षेच्या अंगाने लेखन केले आहे. या लेखनामुळे डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या ग्रंथाचा परिचय होण्यास मोठी मदत झाली होती.निर्मिती प्रकाशन, कोल्हापूर प्रकाशित ज्येष्ठ लेखक डॉ. राजेखान शानेदिवाण यांच्या खाली जमीन, वर आकाश-एक विमर्श या समीक्षा ग्रंथाचा प्रकाशन समारंभ शुक्रवार दि. 7 ऑक्टोबर, 2022 रोजी रोजी संध्याकाळी 5:30 वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे होणार आहे .

या निमित्ताने ज्येष्ठ समीक्षक डॉ. गिरीश मोरे खाली जमीन, वर आकाश या आत्मचरित्राचे अंतरंग उलगडून दाखविणार आहेत. डॉ. जी. पी. माळी यांच्या हस्ते प्रकाशन होणार असून साहित्यिक व समीक्षक मा. विश्वास सुतार कार्यकामाचे अध्यक्ष आहेत.यावेळी डॉ. नंदकुमार गोंधळी, प्रा. वसंत भागवत, मा. जॉर्ज क्रुज, डॉ. दिपककुमार वळवी, डॉ. नामदेव जाधव, प्रा. अरुण कांबळे, डॉ. आरिफ महात, प्रा. डाॕ. स्वप्निल बुचडे आदी मान्यवर सन्माननीय उपस्थिती म्हणून उपस्थित राहणार आहेत.

प्रकाशन समारंभाचे आयोजन डॉ. सुनीलकुमार लवटे नागरी सत्कार समिती, निर्मिती प्रकाशन व संवाद प्रकाशनयांनी केले असून डॉ. सुनीलकुमार लवटे सरांचा प्रेरणादायी जीवन प्रवास समजून घेण्यासाठी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रकाशक अनिल म्हमाने आणि डॉ. शोभा चाळके यांनी केले आहे.