नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा – संपत गारगोटे प्रसिद्ध शिवव्याख्येते

17

✒️मनोहर गोरगल्ले(पुणे,जिल्हा प्रतिनिधी)

राजगुरुनगर (दि-११ आॕक्टोंबर)* कनेरसर ता. खेड, जिल्हा पुणे येथे “ छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन कार्य“ या विषयावरती संपत गारगोटे यांचे व्याख्यान संपन्न झाले.छत्रपती शिवाजी राजांचा आदर्श जर आम्ही घेतला तर आम्ही कर्तुत्वान, चरित्रसंपन्न, नीतीमान आणि कतृत्वान बनू.महाराजांचाच आदर्श आमच्यासाठी, आमच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरेल आणि म्हणून कर्तुत्वावरतील विश्वास ठेवून अभ्यास करून विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये यश संपादन करावं असं संपत गारगोटे यांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी खेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी आदरणीय श्री.जीवनजी कोकणे साहेब, विषयतज्ञ श्री. दयानंद शिंदे सर, केंद्रप्रमुख मा.श्री.बाळासाहेब गावडे, सरपंच सौ.सुनिता केदारी, सामाजिक कार्यकर्ते श्री. चांगदेव झोडगे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, बाळासाहेब दौंडकर, उपाध्यक्ष प्रिया हजारे,सदस्य चंद्रकांत दौंडकर, सौ.अस्मिता माशेरे,सौ.द्वारका सोनवणे,सागर म्हसुडगे, गणेश माशेरे,विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कान्हूर मेसाई चे आदर्श शिक्षक श्री. अविनाशजी दौंडकर सर, कनेरसर शाळेतील शिक्षक, नानाभाऊ गावडे,श्रीम.अंजली शितोळे,श्रीम सारिका राक्षे, श्रीम. शुभांगी जाधव, जालिंदरनगर शाळेचे आदर्श शिक्षक श्री. दत्तात्रय वारे सर, श्री. संदिप म्हसुडगे, हजारेवस्ती शाळेचे श्री. गुलाब हजारे यावेळी स्पोर्ट्स ड्रेसला सौजन्य युवा उद्योजक, श्री. संतोषशेठ रामदास दौंडकर यांनी केले होते त्यांनी विद्यार्थ्यांना खेळासाठी आवश्यक असणारे कपडे भेट दिले होते आणि यावेळी कार्यक्रमाचे सुंदर असे आयोजना व नियोजन पदविधर शिक्षक संघाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष संदीप म्हसुडगे सर यांनी केले होते. यावेळेस यावेळी अनेक मान्यवर ही उपस्थित होते.