स्वतंत्र संग्राम सेनानी शहीद टिपू सुलतान यांच्या जयंती दिना निमित्त शासकीय सुट्टी जाहीर करा-डॉ शेरूभाई मोमीन यांची निवेदनाद्वारे मागणी

15

✒️औरंगाबाद,जिल्हा प्रतिनिधी(सैय्यद कलीमभाई)

औरंगाबाद(दि.12ऑक्टोबर):- संपूर्ण भारत देशाचे थोर स्वातंत्र्य सैनिक देशभक्त फर्स्ट फ्रीडम फायटर, हजरत शहीदटिपू सुलतान यांच्या जन्मोत्सवा निमित्त (10 नोव्हेंबर 2022) शासकीय सुट्टी जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. भारतीय संविधानिक तरतुदी नुसार राष्ट्रीय एकात्मता, मानवता, भाई चारा सभी समाज, जोडो अभियान संकल्प द्वारे ( सर्व धर्म समभाव ) राष्‍ट्रीय अखंडता मानवता, बंधुभाव एकात्मता भाईचारा जोडो स्वराज्य समता, शिक्षण बंधूत्व आरक्षण न्याय अभियान द्वारे ऐतेहासिक असा सामाजिक समाज जागृती संकल्प अभियान राष्ट्रीय एकात्मता कार्यक्रम सर्व धर्मीय धर्मगुरू यांच्या उपस्थितीमध्ये साजरा मोठ्या जल्लोषात होणार आहे असल्याची माहिती देण्यात आली.

फर्स्ट फ्रीडम फाइटर शहीद हजरत टिपू सुलतान यांची जयंती दिनांक 10 नोव्हेंबर 2022 रोजी संपूर्ण भारत देशामध्ये साजरी करण्यात येते, या जन्मोत्सव दिना निमिताने येवला येथे भव्य वृक्षारोपण, ज्येष्ठ नागरिक, अपंग, मतिमंद, अस्थिव्यंग, निराधार, मूकबधिर, कर्णबधिर व विधवा, घटस्फोटीत महिला, गुणवंत विध्यार्थी यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे, औरंगाबाद जिल्हा सुभेदारी शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र मुस्लिम महासंघचे संस्थापक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वाजेद अय्युबभाई जागीरदार, श्री.पंजाबराव वडजे पाटील, राज्य कोअर कमिटीचे प्रमुख सल्लागार, प्रा. रवि अंभोरे, सलीम पटेल वाहेगावकर, शेख पाशुभाई पटेल, हाजी ईसाभाई कुरेशी, सादिकभाई मोमीन, विरोधी पक्ष नेते, हाजी अय्युबभाई जागीरदार, रऊंफ भैय्या पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित बैठकी प्रसंगी नाशिक जिल्हा येवला शहर व तालुका जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते येवला येथी युवा नेतृत्व, आदर्श युवा समाजभूषण डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, यांची निवड करण्यात आली.

आपल्या भारत देशाला इंग्रज सरकार यांच्या जुलमी राजवटीपासून सुटका मिळावी, भारत देश स्वतंत्र व्हावा यासाठी स्वतःच्या रक्ताचा शेवटचा थेंब सुद्धा अर्पण करणारे फर्स्ट फ्रीडम फायटर हजरत शहीद टिपू सुलतान हे एक महान देशभक्त राजे होते. त्यांच्या ऐतिहासिक कार्याचे योगदान येणाऱ्या भावी पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी व देशभक्ती निर्माण करणारा आहेत. त्यामुळे भावी पिढीला त्यांचे बलिदान व कार्य माहिती व्हावे, त्यांचे आदर्श सर्व नवीन पिढी समोर जावे, यासाठी भारत सरकारने दि.10 नोव्हेंबर, रोजी फर्स्ट फ्रीडम फायटर हजरत शहीद टिपू सुलतान यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सर्व शासकीय कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था, बँक व ईतर निम-शासकीय कार्यालय यांना शासकीय सुट्टी जाहीर करावी व तसे आदेश देखील जारी करावे अशी मागणी महाराष्ट्र मुस्लिम महासंघ, महाराष्ट्र मुस्लिम ओ.बी.सी. महासंघ, स्वाभिमानी सेना,अन्याय अत्याचार निवारण जनहित समिती महा.राज्य, कौमे-खिदमत सोशल फाउंडेशन नाशिक जिल्हा, हजरत शहीद टिपू सुलतान सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, यांच्या संयुक्त विद्यमाने जाहीर मागणी एका निवेदनाद्वारे भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, राज्यपाल यांना, तसेच सर्व जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय, तहसीलदार, कार्यालय यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तथा नाशिक जिल्हाध्यक्ष, आदर्श युवा समाज भूषण जनसेवक डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, आणी संबंधित सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या स्वाक्षऱ्या निशी एका लेखी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे,