भगवती देवी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

34

✒️सिद्धार्थ दिवेकर(उमरखेड प्रतिनिधी)

उमरखेड(दि.16ऑक्टोबर):-भगवती देवी विद्यालय, देवसरी उमरखेड येथे निसर्गरम्य अशोक वृक्षाच्या निवांत छायेखाली कार्यक्रमाला आठ वाजता सुरुवात झाली. प्रथमतः भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस हा पूर्ण भारतभर वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयातील शारीरिक शिक्षक श्री एस. वाय. शेख यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन केले. दिनेश वानरे राजेश सुरोशे गणेश शिंदे अनिल अल्लडवार सौ. मीना कदम मारोती महाराज अरविंद चेपुरवार यांची उपस्थिती होती. तर या कार्यक्रमास डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर विद्यालयाचे कुशल मार्गदर्शक तथा मुख्याध्यापक प्रल्हादराव मिरासे यांनी महत्त्वपूर्ण विचार मांडले.

यावेळेस त्यांनी मिसाईलमॅन यांना आपल्या वाचनातूनच खरी आदरांजली मिळेल व सर्व विद्यार्थ्यांनी वाचनाचा छंद जीवनभर जोपासला पाहिजे. वाचन केल्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे जीवन सार्थक होईल. ग्रंथ हेच गुरु आहे. असे विचार त्यांनी यावेळेस मांडले. विद्यार्थ्यांनी आठ ते साडेदहा पर्यंत वाचन विद्यालयातील अशोक वृक्षाच्या छायेखाली विद्यालयातील ग्रंथालयातील विविध पुस्तकाचे वाचन केले. व वाचनासाठी भरभरून प्रतिसाद विद्यार्थ्यांनी दिला. हे विशेष म्हणावे लागेल.प्रस्तुत कार्यक्रमाचे संचलन श्री दिगंबर माने यांनी केले तर तज्ञ आभारप्रदर्शन भागवत कबले यांनी मानले. व कार्यक्रमाची सांगता झाली.