म्हसवड मतदारसंघात शिक्षक संघ ‘एकसंघच’;संघाचा उमेदवार बहुमताने निवडून आणण्याचा एकमताने निर्धार

38

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.17ऑक्टोबर):- सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणूक प्रक्रियेने गती घेतली असून म्हसवड मतदार संघातून तीन ते चार उमेदवार शिक्षक संघाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असले तरी संघटना देईल तो उमेदवार बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार शिक्षक संघाच्या म्हसवड विभागीय मेळाव्यात घेण्यात आल्याने संघ कार्यकर्ते आणि शिक्षकांमध्ये उत्साह संचारला आहे.

शिक्षक संघाचे जेष्ठ मार्गदर्शक अनंत पोळ, पोपट जाधव, बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या मेळाव्यास बहुसंख्य शिक्षक बांधव उपस्थित होते. यावेळी जयंत कापरे, इन्नूस इनामदार, अशोक गंबरे, जमादार गुरुजी, महादेव तोरणे, पंढरीनाथ बनसोडे, बाजीराव कापसे, पोपट बनसोडे, विष्णू पिसे आदी जेष्ठ मार्गदर्शक,शिक्षक संघाचे सरचिटणीस सुभाष गोंजारी तसेच महिला आघाडी तालुका अध्यक्षा शिलावती पराडे – साळुंखे मॅडम उपस्थित होत्या.

अनंत पोळ गुरुजी यांनी एकजूटीने लढल्यास आपला विजय निश्चित असल्याचे सांगितले. पोपट जाधव म्हणाले की यावेळी कोणताही गट – तट न म्हणता आपण शिक्षक संघ म्हणूनच ही निवडणूक लढणार आहोत. तर बाळासाहेब पवार यांनी म्हसवड हा शिक्षक संघाचा बालेकिल्ला असून तो बहुमताने पुन्हा निवडून आणण्याचा संघटनेचा निर्धार असल्याचे सांगितले.

तर विद्यमान संचालक यांनी आर. डी. खाडे यांनी विद्यमान संचालक मंडळाने सभासद हिताचाच कारभार केला असल्याचे सांगितले. अनेक कर्ज प्रकारांचा व्याजदर नऊ टक्क्यांपेक्षा खाली पहिल्यांदाच आणलेला असून डी. एम. फंड, कुटुंबं कल्याण निधी इत्यादी, सलग सात वर्ष नऊ टक्के वाटप सलग ,डिव्हीडंड वाटप केला , मयत सामान्य सभासदास २० लाख तर NPS धारक सभासदास २५ लाख रुपयापर्यंत मदत देण्याचा दुरागामी निर्णय घेतल्याने सामान्य सभासद संघासोबतच राहणार असल्याचे सांगितले.

यावेळी देवापूर येथील राजीव हत्तीकर तसेच सुंदरराव पैठणे, किशोर पाटील, दत्ता शेळके, राहुल कवठाळे, कांतीलाल खाडे, किशोर पाटील, राहुल पालवे आदी तरुण कार्यकर्ते तसेच जेष्ठ कार्यकर्ते झिमल गुरुजी यांचेही स्वागत करण्यात आले. जांभूळणी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश सातपुते यांनी आभार मानले.