चिंतनशील दिपोत्सव!

33

भारत हा कृषिप्रधान देश आहे, शेती आणि शेतीशी संबंधित सर्व आर्थिक उलाढाली त्यानाचं डोळ्यासमोर ठेवून पार पडला जातात. तरी मग देशातील शेतकरी आत्महत्या का करतो. सर्व शेतकऱ्यांचा धर्म हिंदूच आहे. सर्वांचे सण उत्सव एकच असतात. त्यात जात कधी आडवी येत नाही. शेतकऱ्यांचा कष्टकरी कामगार, कर्मचारी अधिकारी यांचा दिपावली एकच सण मोठ्या उत्सवात साजरा होतो, शेतकऱ्यांच्या घरात विविध प्रकारचे अन्न धान्य, फळ, फराळ येतात. त्यामुळे घरात आनंद असतो, तसाच कामगार कर्मचारी अधिकारी यांना दिवाळीला बोनस सानुग्रह, बक्षीस मिळतात. देश किती ही संकटात असला तरी आमदार- खासदार आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार, वेतनवाढ कधीच थांबत नाही. आणखी एक अजब प्रकार मान्यताप्राप्त आहे, तो म्हणजे कांदा बाजार भावांवर ठरत असतो, कांदा महाग झाला तर वेतनवाढ मिळते, कांदा भाव कमी झाला तर वेतनवाढ कमी होत नाही तर तो स्थिर राहते.

त्यांचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना भेटतो. कारण येथे ब्राह्मण वैश्य क्षत्रियांची दोस्ती युती आघाडी शेतकऱ्यांचे योग्य शोषण करण्याचे काम कृषिउत्पन्न समिती द्वारे चोख करते. देशभरात शेतकरी आत्महत्या का करतात? त्यांचे चिंतनशील दिपोत्सव निमित्याने झाले पाहिजे. पण ते होत नाही. कारण लिहणारे साहित्यिक, विचारवंत, संपादक- पत्रकार यांच्या वर्ण व्यवस्थेत शेतकरी व शेतकऱ्यांची जात बसत नाही. आणि माझ्या सारख्याने लिहले तरी त्याला प्रसिद्धी देणे हे त्यांच्या वैचारिकतेत बसत नाही. त्यामुळे आर्थिक वैचारिक हितसंबंधात बाधा येऊ शकते म्हणून ते प्रसिद्ध होत नाही. काही संपादक प्रसिद्धी देतात पण लगेच लेखाच्या शेवटी टीप देतात लेखकांचे हे व्यक्तिगत मत आहे. त्याला संपादक सहमत नाहीत.तरी लेख प्रसिद्धीस दिला म्हणून त्याबद्ल त्यांचे हार्दिक अभिनंदन केलेच पाहिजे.

भारतातील दिपावलीचा सबंध हिंदू धर्माच्या अनेक भाकड कथेशी जोडला जातो. कधी तो रामायण, महाभारतातील वर्णसंघर्षाशी जोडला जातो तर कधी मनुस्मृती नुसार बळी राजा वामनाच्या तीन पावलाने आकाश, पातळ व्यापुन टाकतो. कधी तो संभाजी महाराजांना मनुस्मृती नुसार हलाहल करून मारतो आणि त्यांचे मुडके काठीला बांधून गांवभर मिरवणुकीत मिरवून घराघरावर आनंद उत्सव म्हणून गुढी उभारतो. दारात कंदील आणि दिव्याची माळ लावुन कोणता उत्सव साजरा करतो. हे कोणत्याही जाती धर्माचा माणूस शंभर टक्के सत्य सांगु शकत नाही. प्रत्येकांचे उत्तर एकच वाड वडिलोपार्जित परंपरा रितीरिवाज आहे, त्यांचे पालन केले पाहिजे. बाकी उत्सव पर्व समता, स्वातंत्र्य, बंधुभाव कुठेही दिसत नाही. प्रचंड प्रमाणात विषमता घराघरात भरली आहे. म्हणजेच एकत्र आनंद उत्सव नाहीच. चिंतनशील दिपोत्सवची ही झाली एक बाजू तर दुसरी बाजू.

भारत देश हा फक्त आणि फक्त बौद्ध संस्कृतीचा देश होता. येथे ज्याही गोष्टी पर्वाच्या रुपात दिसतात ती फक्त बौद्ध संस्कृती आहे. हिंदू धर्मात कोणताही पर्व साजरा केलाच जाऊ शकत नाही, कारण ज्या समुहात विषमता आणि दु:ख; असते तिथे आनंद साजरा होत नसतो. पर्व तिथेच साजरे होतात जिथे समता असते. आणि समता फक्त बौद्ध धम्मात आहे. अन्य कोणत्याही धर्मात समता नाही. दिप फक्त बुद्धासमोर लावतात. मुळात दिपावली हा सण दिव्याच्या आनंदत्सोवचा आहे. हा हिंदूंचा सण नसून तो बौद्धांचा सण आहे. हिंदू धर्मात कोणताच सणच नाही. कारण हिंदु हा धर्मच नाही. हिंदू धर्मातील सण बौद्ध धर्मातील कॉपी पेस्ट आहे. हिंदू धर्मानुसार दिवाळीचे जे पाच दिवस कथा स्वरुपात दिले आहेत. त्या पूर्णत: काल्पनिक भाकड कथा आहेत. त्यातील कोणतीच गोष्ट सिद्ध करता येत नाही. लक्ष्मीपूजन, विष्णू, देव, नरकासुर या हास्यास्पद भाकड कथा आहेत. यांचा विज्ञानाशी तर्कसंगत तिळ मात्रही संबंध नाही. या भाकड कथानाच हिंदुनी त्यांचे सण मानून घेतलय. कोणतेही तर्कसंगत कारण नसतांना मराठा मागासवर्गीय ओबीसी स्वतःला हिंदू समजून हिदू धर्मीय सण साजरे करीत असतात. तिथे बौद्ध धम्मात सणांना कारण असते. विनाकारण कोणतीही गोष्ट घडत नाही. हाच बुद्धाचा प्रतीत्यसमुद्पाद सिद्धांत आहे.

सणांची सुरवात भारतात बौद्ध संस्कृतीतून झाली आहे. सण तेव्हा साजरे केले जातात जेव्हा आनंद होत असतो आणि आनंद तिथे साजरा होत असतो जिथे सर्व बाबतीत समानता असते. हिंदू समाजात जोगोजागी विषमता असल्यामुळे तिथे सर्वानुमते आनंदोत्सव सणाच्या स्वरुपात साजरा होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणूनच चिंतनशील दिपोत्सव हा सण साजरा करण्याचा उत्साहात कमी दिसत नाही. वाड वडिलोपार्जित परंपरा रितीरिवाज म्हणूनच तो पाळल्या जात असतो. आणि आहे. दिपावलीचे महत्व बौद्ध धम्मात आहे. अडीच हजार वर्षापूर्वी बुद्धाला ज्ञान प्राप्त झाल्यामुळे याच दिवसात तथागताच्या स्वागतासाठी जोगोजागी बुद्धाच्या अनुयायांनी लाखो दिवे लावून जनतेने आनंद साजरा केला होता. भारत हा शेतकऱ्यांचा देश आहे. इथला प्रमुख व्यवसाय शेती आहे. ग्रिष्म ऋतू नंतर शेतकरी, काम करणारे मजूर हे त्यांच्या पिकांना भाव देतात. तो महिना अश्विन महिना असतो. त्यामुळे शेतकरी व त्यावर अवलंबून असणाऱ्या मजुरांजवळ जवळ अन्न- धान्य, पैसा येतो. त्यामुळे हे लोक दीप लावून, गोडधोड करुन, घरे सारवून उत्सव साजरा करतात त्याचे नांव दिवाळी. हे हजारो वर्षापासून सुरु आहे. भारताचे बहुतेक सण हे जमिन, मालक आणि मजुरांवर वर आधारीत आहेत. या बाबतीत चिंतनशील दिपोत्सव हा सण साजरा केला जातो.

बुद्ध काळात हा सन प्रज्ञावली म्हणुन साजरा केला जात होता. ही प्रथा राजा सम्राट अशोकानी तशीच पुढे चालू ठेवली. पुढे अशोकानंतर या पर्वावर प्रतिक्रांती झाली. या सणाची सुरवात अशोकाने इ.स. पुर्व २५७ ला केली होती. बुद्धाने ८४००० वचने प्रस्तुत केलीत म्हणुन सम्राट अशोकाने ८४००० हजार बौद्ध स्तूप बांधले असे दिपवंश म्हणतो. हेच औचित्य लक्षात घेउन अशोकाने कार्तिक अमावस्येला जागोजागी दिपमाला आणि पुष्पमाला अलंकृत केले होते. रस्ते दिवे लाऊन सजविण्यात आले होते. ८४००० हजार स्तुपाप्रमाणे अशोकाने ८४००० दिप प्रज्वलीत केलेत. हा पर्व सतत सात दिवस चालला होता. भिक्कू आणि उपासकाना दान स्वरुपात धन देण्यात आले होते. म्हणुन तो दिवस दीपावलीचा धनोत्रय दिवस म्हणून साजरा केला गेला. कारण अशोकाने आपला संपूर्ण खजिना धम्मासाठी दान केला होता. (अधिक वर्णनासाठी पहा महावंश पान न. ४९) यामित्ताने प्रत्येक घर आणि विहार स्वच्छ करुन वंदना घेण्यात येत होत्या. या पर्वाच्या निमित्ताने प्रत्येक घराच्या आंगणात एक छोटे छोटे स्तुप बनविण्यात आलेत. आज आपण बहुसंख्य मराठा ओबीसी मागासवर्गीय समाजाच्या अंगणात जे वृंदावन, किल्ला, कुंडी हिंदूंच्या अंगनात पाहतो त्याचा इतिहास तोच आहे. या उत्सवाला देश विदेशची ८० करोड जनसंख्या आणि सोबत भिक्कू उपस्थित होते असे प्राचिन दिपवंश या ग्रंथात लिहिल्या गेले आहे. चिंतनशील दिपोत्सव केवळ कंदील दिवा लाऊन फटाके फोडण्यासाठी नसावा. त्यामागील सत्य इतिहास जाणून घेण्यासाठी असावा.

श्रीलंका येथे आजही बौद्ध धम्माच्या मतानुसार दीपावली साजरी केली जाते. राजा तिष्यने याच कार्तिक अमावस्याच्या दिवसात बौद्ध धम्म दिक्षा घेतली होती आणि श्रीलंकेत आनंदोत्सव साजरा केला होता. चिंतनशील दिपोत्सव हा लेख लिहतांना खूप संदर्भ पाहिले, वाचले. प्रत्येकात काळानुसार बदल जाणवला त्यातील मला जे योग्य वाटले तेच मी केला. दिवाळी म्हणजे चिंतनशील दिपोत्सव सर्व जाती धर्माच्या गरीब श्रीमंत माणसांच्या आनंदाचा सण असतो. तो निसर्गाने सर्वांना आपल्या परीने उत्सवात साजरा करण्याचा समान अधिकार दिला आहे. शेती करणारा शेत मजूर आणि शेतीचा मालक शेतकरी त्यांच्या उत्पनावर आधारित एकूण सर्व बाजार पेठ त्यातील दुकानदार, कामगार, मालक गिऱ्हाईक सर्वांचे हितसंबंध एकमेकात गुंतलेले असतात. त्यामुळेच प्रत्येक माणूस एकमेकाला ही दिवाळी सर्वांना आनंदाची सुख समृद्धीची जावे असे म्हणतो. म्हणजेच अज्ञान-अंधश्रद्धा अंधार दिप प्रकशित करून नष्ट हो हीच कामना करून घरात दारात पणत्या लावतो. आणि उंच जागेवर कंदील लावतो. त्याचा उद्देश चिंतनशील दिपोत्सवाने प्रकाशमय हो हा असतो. असा सर्वाना समान न्याय, समान अधिकार देणाऱ्या चिंतनशील दिपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.

✒️सागर रामभाऊ तायडे(भांडूप मुंबई)मो:-९९२०४०३८५९