लोकशाही प्रणाली वाचवण्यासाठी!

17

आमची लोकशाही यंत्रणा बिघडली.म्हणून या समस्या निर्माण झाल्या.का बिघडली?आम्ही बिघडलेली माणसे निवडून दिली.ज्यांनी मतांची खरेदी विक्री केली.हा व्यापार जळगाव पुरता, अमळनेर पुरता मर्यादित राहिला नाही.तर विधानसभा पर्यंत पोहचला.आमदार सुद्धा सर्रास गाई म्हशी ,घोडा,गाढवांसारखे विकले गेले.महाराष्ट्रातील सेनेचे चाळीस आणि छुटपुट दहा आमदार जळगाव च्या सत्तावीस नगरसेवकांपेक्षा जास्त नालायक निघाले.कर्नाटक मधे कांग्रेस चे आमदार विकले गेले.भाजपने खरेदी केले.मध्य प्रदेश मधे कांग्रेस चे आमदार विकले गेले.शिवराज सींग चव्हाण मुख्यमंत्री बनले.गुजरात मधे कांग्रेस चे आमदार विकले गेले.ज्यांना सत्तेवर येण्यासाठी गुजराती माणसांनी निवडून दिले होते.आत्ताच गोवा चे आठ आमदार विकले केले.कांग्रेस चे माजी मुख्यमंत्री सुद्धा.इतके नालायक आणि निर्लज्ज माणसे आमदार निवडून येतात तरी कसे?तिकडे आसाम कडेही तेच झाले.

याला घोडेबाजार म्हणता?नाही‌.हा गाढवांचा बाजार झाला.ही गाढवे इकडची तिकडे विकली गेली.आम्ही जळगाव ग्रामीण चे मतदार, एरंडोल चे मतदार,पाचोरा चे ,चोपडा चे मतदार तरीही चूप का? या विकाऊ आणि भिकारड्या आमदारांना तर मतदारांनी सळो कि पळो करून सोडायला हवे होते.लाज लज्जा शरम असती तर दोन चार आमदारांनी आत्महत्या केली असती.पण आम्ही नागरिक स्वताला गुलाम समजून घेतो.समोर येऊन गुलाम म्हटले कि राग येईल पण वास्तवात तो गुलामच आहे.तो डरपोक आहे.तो भित्रा आहे.तरीही तो जय शिवाजी,जय भवानी म्हणतो.तरीही तो जय भीम म्हणतो.असे म्हणणारा सुद्धा म्लेंच्छ आहे.हा फक्त इतिहासातील महापुरूषांच्या आड लपून जीव वाचवतो.जर मर्द असता तर आमदार याला घाबरला असता.तर वाटले असते,हा छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणीतरी लागतो.अन्यथा ऐरागैरा वाटतो.

जर या आमदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विरोध करायचा होता, हाणून पाडायचे होते तर यांनी हा लढा विधानसभेतच दिला असता.तेथेच ताठ मान करून बोलले असते‌.ठाकरे साहेब,तुमचे चुकले आहे.तुम्ही चुकत आहात.आम्हाला तुमचे नेतृत्व मान्य नाही.तुम्ही राजीनामा द्या.पण तितके नैतिक बळ यांच्यात नव्हते.ते पळाले आसामच्या जंगलात.आसामच्या जंगलात विधानसभा होती का?का पळाले?म्हणे येथे विरोध केला असता तर आम्हाला कैद केले असते.ही नामर्दाची भीती आहे. इंग्रजी अमदानीत आंदोलन करून जेलमध्ये गेलेले खरे मर्द .आणिबाणीच्या काळात एकोणीस महिने जेलमध्ये राहिलेले खरे मर्द! हे कसले मर्द?. मर्दाची पगडी गुंडाळलेले म्लेंछ! तेच चुकीच्या मार्गाने आमदार निवडून आणले होते.आधिकतम तर तद्दन गुन्हेगार आहेत.हे सिद्ध करायची गरज नाही.आधिकतम चोर होते.हे सांगायची गरज नाही.याच गुन्हेगारांनी,याच चोरांनी लोकशाही नासवली.याला आम्ही मतदार सुद्धा जबाबदार आहोत.कसे?यांचे पुर्व चारित्र्य,यांचे काळे धंदे,यांचे लफडे माहिती असूनही आम्ही याला मतदान केले.तर मग, आम्हाला ही खेद खंत वाटला पाहिजे.पण आम्हीच मतदार नालायक आहोत.आम्हीच आमचे मत विकले होते.आम्हीच बेअब्रू आहोत.तर आमची सुद्धा ताठ मान करून बोलायची हिंमत होत नाही.तरी म्हणतात, आम्ही छत्रपती शिवाजी महारांजांचे अमुक ढमुक.महाराज हयात असते तर मोहिमेवर जाण्या आधीच या म्लेंछांना कत्ल_ए _ आम केले असते.

जळगाव शहर कवियत्री बहिणाबाईंचे नांव सांगून ढिंढोरा पिटवते.अमळनेर शहरातील तालुक्यातील लोक पुज्य साने गुरूजींचा वारसा सांगतात. पण येथलाच नागरिक,अगदी महिला सुद्धा दारू विक्रेत्याला मतदान करतात. केले आहे.हे भयंकर विदारक सत्य आहे.याचा पुरावा देण्याची गरज आहे काय? हे आहे आम्ही मतदारांचे नैतिक अध:पतन.हे पतन लक्षात आणून देणे,थांबवणे यासाठी माझा प्रयत्न आहे.

कांग्रेसचा आमदार पाडून भाजपचा निवडला.भाजपचा पाडून सेनेचे निवडला.सेनेचे पाडून राष्ट्रवादी चा निवडला.हे याचे निरसन नाही.जर एका चोराला हाणून पाडण्यासाठी दुसरा पारंगत चोर निवडून आणत आहोत तर ,हा इलाज नाही.हा पर्याय नाही.एका चोराला हाणून पाडून सज्जन माणूस निवडून दिला पाहिजे.तरच आम्ही मतदार सज्जन आहोत,असे सिद्ध होईल.तरच आम्ही मतदार छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक आहोत,असे मिरवता येईल.

हा मतदार म्लेंच्छ का झाला?काही लोकांना अब्रूचे महत्व नव्हते.कष्ट करण्याची दानत नव्हती.म्हणून अब्रू विकत असत.पोट भरत असत.त्यामुळे कुटुंब व्यवस्था,समाज व्यवस्था बिघडत असे.म्हणून अशा लोकांना गावात प्रवेश नसे.चीड मानली जात होती.तसेच आज ही मत विकणाऱ्या लोकांची चीड मानली गेली पाहिजे.ज्यामुळे राज व्यवस्था बिघडली आहे.अशा लोकांची चीड आली पाहिजे.राज व्यवस्था, लोकशाही प्रणाली शाबूत ठेवण्यासाठी.

✒️शिवराम पाटील(९२७०९६३१२२)महाराष्ट्र जागृत जनमंच,जळगाव