कवी विशाल इंगोले (अजातशत्रू) यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने काव्य उपक्रमाचे आयोजन

15

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अमरावती(दि.23ऑक्टोबर):-काव्यनिनाद साहित्य समूह पुणे समूहाचे संस्थापक अध्यक्ष विकास पालवे यांच्या अध्यक्षतेखाली युवा कवी विशाल इंगोले (अजातशत्रू) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रीत तुझी माझी या विषयावर आणि सर्वधर्मसमभाव साहित्य व सांस्कृतिक मंच संस्थापक अध्यक्ष सुनिता तागवान ,देविदास गायकवाड यांच्या वतीने शालीन व्यक्तीमत्व या विषयावर चारोळी लेखन उपक्रम राबविण्यात येत आहे.

कवी विशाल इंगोले (अजातशत्रू) हे संभाजी ब्रिगेड व संगीतसूर्य केशवराव भोसले राष्ट्रीय सांस्कृतिक परिषद भारत मध्ये सामाजिक राजकीय काम करून वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन करतात गरजवंतांना रक्त पुरवठा करण्याचे कार्य करीत असतात. त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांचा यथोचित काव्यलेखनातून सन्मान व्हावा म्हणून या दोन्ही राज्यस्तरीय समूहातर्फे या उपक्रमाचे आयोजन केले आहे*