पुसद येथे जिवनधारा महिला समिती पुसद यांच्या वतीने शेल्टर किटचे वाटप

91

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.23ऑक्टोबर):-येथील ज्येष्ठ नागरिक भवन, विरंगुळा केंद्र येथे जीवनधारा महिला समिती पुसद, स्वस्ती द हेल्थ कॅटलिस्ट, विश्वभूषण बहुउद्देशीय संस्था, नवचेतना युवा विकास संस्था यांच्या वतीने शेल्टर किटचे वाटप करण्यात आले. ह्या किट मध्ये दोन ताडपत्री, मच्छरदानी, बकेट, मेणबत्ती पँकेट, सॅनिटरी पॅड, मास्क, आंघोळीच्या साबण व कपड्यांच्या साबण ईत्यादी वस्तूचा समावेश आहे. या किट अमेझॉन, डोनेट कार्ट, कम्युनिटी ॲक्शन कोलँब यांच्या संयुक्त विद्यमानाने जीवनधारा महिला समिती पुसद यांना निशुल्क स्वरूपात पुरविण्यात आल्या होत्या.

पुरामुळे व अतिवृष्टीमुळे ज्यांच्या घराची पडझड झाली आहे त्यांना ही तात्पुरती निवारा किट ची मदत निशुल्क स्वरूपात देण्यात आली. यामध्ये पुसद, महागाव, उमरखेड तालुक्यांतील काही गावांचा समावेश आहे. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सदर किटचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जीवनधारा महिला समितीच्या अध्यक्षा कल्पनाताई गावंडे ह्या होत्या, प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नागरिक भवन, विरंगुळा केंद्राचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी सैनिक तथा भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष भारतभाऊ कांबळे , मंगलाबाई सराफ पोलीस पाटील साई बोरी, मधुकर महाराज गायमुख नगर, शिवलीला मोरेकर ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वीस्तेसाठी माजी सैनिक भारतभाऊ कांबळे, सुरेंद्र गावंडे, भगवान खंदारे, सुशील कांबळे, समाधान बबन चव्हाण, रामा प्रभुदास मोरेकर तसेच जीवनधारा महिला समितीचे पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.

यावेळी लाभार्थ्यांनी जिवनधारा महिला समिती पुसद अध्यक्ष कल्पना गावंडे, सचिव शिवलिला मोरेकर, मँनेजर सुरेंद्र गावंडे यांच्यासह ॲमेझॉन, डोनेट कार्ट, कम्युनिटी ॲक्शन कोलँबच्या पदाधिकारी मंडळीचे आभार मानले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भगवान खंदारे यांनी केले तर प्रास्ताविक जीवनधारा महिला समितीचे मॅनेजर तथा विश्वभूषण बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र गावंडे यांनी केले. आभार प्रदर्शन शिवलीला मोरेकर यांनी केले.