वसुबारस उत्सव शेतकरी व ग्रामस्थांसोबत साजरा

38

🔸माजी जि.प.सदस्य संजय गजपुरे यांचा उपक्रम

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

नागभीड(दि.22ऑक्टोबर):-गाय हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. त्याचे मानवी जीवनाच्या इको-सिस्टिममध्ये मोठे महत्त्व आहे. `गाय म्हणजे माय` असे अभियान देशात सर्वत्र सुरु आहे. दिवाळीत वसुबारसच्या दिवशी गाय आणि पाडसाची पूजा सर्वत्र केली जाते. हेच निमित्त साधत माजी जि.प.सदस्य व भाजपा जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे यांनी कोसंबी गवळी येथे सपत्नीक पुजन करीत वसुबारस शेतकरी व गावकऱ्यांसमवेत साजरी केली.नागभीड तालुक्यातील पारडी- बाळापुर जि.प.क्षेत्रातील कोसंबी गवळी येथील प्रगतीशील शेतकरी इसोबा संपत सारये यांच्या घरी असलेल्या गाय व वासरु यांची विधिवत पुजा संजय गजपुरे यांनी सपत्नीक केली .

याप्रसंगी इसोबा संपत सारये व सौ.सुनंदा इसोबा सारये या शेतकरी दाम्पत्याचे गोंडवाना विद्यापीठ नवनिर्वाचित सिनेट सदस्या सौ.किरण संजय गजपुरे यांनी शाल , श्रीफळ व भेटवस्तु देऊन सत्कार केला. तसेच उपस्थित गावकऱ्यांना यावेळी दिवाळी निमित्य शुभेच्छा देत मिठाई चे वाटप करण्यात आले .

याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधत सध्या जनावरांवर सुरु असलेल्या लम्पी रोगाबाबत चर्चा केली व त्यावरील उपाययोजनांबाबत माहिती दिली. यावेळी माजी सरपंच मच्छिन्द्रनाथ चन्नोडे , ग्रा.पं.सदस्य कैलास रंधये , पं.स.प्रमुख भोजराज नवघडे, शक्ती केंद्र प्रमुख गुरुदेव नागापुरे , बुथ प्रमुख प्रविण श्रीरामे , अजयजी भजे , सौ. बबिताताई भजे, प्रगतीशील शेतकरी नवलाजी दडमल , देवीदास रंधये , अरुण सारये , सहदेव रंधये , गणपती ठाकरे , मनाजी दडमल , अशोक सारये , लवकुश सारये , सौ.मंजुषाताई दडमल , सौ.दर्शनाताई ढोक व ग्रामस्थ उपस्थित होते.