✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(9जुलै):-विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार पु.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले ‘राजगृहा’वर काल संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात राजगृहाच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच राजगृहाच्या खिडकी व दरवाजाचे काचांवरही दगडफेक झाली आहेत. यात राजगृह्यामधील बागेत असलेल्या कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात,आंबेडकरी जनतेचे अस्मितेचे हे एक महत्वाचे स्मारक आहे. इतकं महत्त्वाचे हे स्थान असताना सुद्धा त्या ठिकाणी असे कृत्य घडणे महाराष्ट्रला कलंकित करणारी घटना आहे त्याकरिता आम्ही आंबेडकर अनुयाया राजगृहावर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध करतो.
काल संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरुंनी हा प्रकार केलाय. यात त्यांनी घराबाहेरील CCTV चेही मोठे नुकसान केलंय. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे CCTV फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे. आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.
तरी महाराष्ट्र सरकार ला आम्ही विनंती करतो की हा हल्ला कोणी केला आणि कोण सूत्रधार आहेत याचा संपूर्ण तपास जलद गतीने करण्यात यावा ही निवेदनातून विनंती करण्यात येत आहे.या वेळीस अशोक निमगडे, प्रेमदास बोरकर,अशोक रामटेके,विशालचंद्र अलोने,ज्योति शिवणकर, गीता रामटेके,प्रेरणा करमरकर, अनुजा वानखेड़े, प्रतिक डोर्लिकर,एस.के वेल्हेकर, नागसेन वानखेड़े, राजकुमार जवादे, अशोक ठेंबरे,(समता सैनिक दल)अशोक फुलझले(समता सैनिक दल),प्रेमदास रामटेके,सहारे साहेब आदी उपस्थित होते……

चंद्रपूर, महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED