आदिवासी गोवारी जमात युवा संघटने तर्फे साहित्यिक राजेश बारसागडे यांचा सत्कार

30

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

नागभीड(दि.28ऑक्टोबर):-नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील आदिवासी गोवारी जमात युवा संघटनेच्या वतीने येथील शिवनगर परिसरातील गायगोधन कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य ‘बालकवी’ पुरस्कार प्राप्त कवी ‘कोंबडा झाला घड्याळ’ कार राजेश देवराव बारसागडे यांचा बुधवारी सत्कार करण्यात आला.

मागील 3 वर्षांपासून आदिवासी गोवारी जमात युवा संघटना गावातील यासमाजाची,देशाची सेवा करणाऱ्या सेवावर्तीचा सत्कार करीत आहे.ज्यामुळे इतरांना प्रेरणा मिळेल.हाच युवा संघटनेचा मुख्य उद्देश राहिला आहे.येथील महाराष्ट्र शासनाचा ‘बालकवी’ पुरस्कार प्राप्त कवी “कोंबडा झाला घड्याळ”कार राजेश बारसागडे हे मागील 27 वर्षांपासून साहित्यातून समाजाची सेवा करीत आहेत.

याशिवाय पारदर्शक पत्रकारिता,सामाजिक सेवा या क्षेत्रातही त्यांचे भरीव योगदान राहिले आहे.या बाबीची दखल घेत युवा संघटनेने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले ग्रा.पं.सदस्य शिवशंकर सहारे यांच्या शुभ हस्ते त्यांचा शाल,श्रीफल,पुष्पगुच्छ व पेन देऊन सत्कार करण्यात आला.याबद्दल त्यांचे मित्र परिवार,कविमित्र,पत्रकार मित्र आणि तमाम रसिकांनी अभिनंदन केले आहे.