ऊसाच्या शेतात पिकवला गांजा! कामती पोलिसांची कारवाई एकास अटक

71

🔹दोन महिन्यातील दुसरी कारवाई

✒️कुरुल प्रतिनिधी(नानासाहेब ननवरे) 

मोहोळ(दि.1नोव्हेंबर):- तालुक्यातील कामती खुर्द (लमाणतांडा) येथील शेतकऱ्यांने ऊसाच्या पिकामध्ये केली होती गांजाची लागवड , ७५ रोपे आढळून आली आहेत. गांजाची शेती करणे तसा कायद्याने गुन्हा असला तरी वेगवेगळ्या माध्यमातून शेतकरी गांजाची लागवड ही करीतच आहेत.अशाच प्रकारे कामती खुर्द येथे बाजीराव लोभा राठोड यांनी ऊसाच्या पिकात 75 रोपांची लागवड दरम्यान केली होती.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.31/10/2022 रोजी 16/30 वा. चे सुमारास आरोपीच्या शेत जमीन गट नं 51/1/ब मधील मौजे‌.दादपुर शिवारात ऊसाचे पिकात छापा टाकून ७० रोपे आणि 9,07,900 रुपयेचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.यावेळी सहायक पोलिस निरीक्षक अंकुश माने, पोलिस हवालदार बबन माने, यशवंत कोटमोळे, भारत चौधरी, अमोल नाईकवाडे, जीवराज कासविद, पवार आदीसह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

कामती पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. व कलम – 255/2022 अंमली पदार्थ व मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनीयम 1985 चे कलम 8(ब)(क),20(ब)ii(क) प्रमाणे फिर्यादी* – पोहेकॉ/303 जिवराज जनार्धन कासवीद, कामती पोलीस स्टेशन
दाखल अंमलदार – पोलीस हवालदार माने ,तपास अधिकारी – सहायक पोलिस निरीक्षक अंकुश माने

गुन्ह्यतील मिळालेला माल – 9,07,900/-रूपयाचा . एकूण वजन 90.790 किलो गांजाची ओली हिरवट रंगाचा पाला असलेली लहान मोठी 75 झाडे मुळासकट तिन ठिक्यात भरलेली पैकी एका पांढरे ठिक्याचे वजन 30.360 किलो व दुसरे पांढरे ठिक्याचे वजन 22.480 किलो व पिवळया रंगाचे ठिक्याचे वजन 37.950 किलो असे असलेले अंदाजे किंमती 9,07,900/- रुपयांचा आहे

शिवाय संशयित आरोपी बाजीराव लोभा राठोड याला ताब्यात घेतले असून कामती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री सरदेशपांडे सर , अप्पर पोलीस अधीक्षक श्री जाधव सर , मा. उपविभागीय पोलीस अधिकारी भारती सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक अंकुश माने हे करत आहेत.