राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कारसाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

28

✒️कोल्हापूर(पुरोगामी न्युज नेटवर्क)

कोल्हापूर(दि.1ऑक्टोबर):-28 नोव्हेंबर हा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन म्हणून सर्वांनी साजरा केला पाहिजे. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी शिक्षण आणि समाज परिवर्तनामध्ये मूलभूत व क्रांतिकारी कार्य केले आहे. त्यांच्या विचारांना आदर्श मानून कार्यरत असणाऱ्या शिक्षण क्षेत्रातील शिक्षक/शिक्षिका यांना प्रागतिक लेखक संघ व निर्मिती विचारमंच, कोल्हापूर यांच्या वतीने राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार देऊन 28 नोव्हेंबर, 2022 रोजी कोल्हापूर येथे सन्मानित करण्याचे नियोजित आहे.

प्रागतिक लेखक संघ व निर्मिती विचारमंच, कोल्हापूर या दोन्ही संस्था पुरोगामी, परिवर्तनवादी, विज्ञाननिष्ठ, तथागत बुद्ध, जगतज्योती बसवण्णा, राष्ट्रमाता जिजाऊ, राजमाता अहिल्याबाई होळकर, माता सावित्रीमाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, विद्रोही संत तुकाराम, समतावादी वारकरी परंपरा, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, लोकराजे राजर्षी शाहू महाराज, शहीद भगतसिंग, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसिंह नाना पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना अभिप्रेत अशा प्रबोधनाच्या क्षेत्रात कृतिशील पद्धतीने कार्यरत आहेत.
वरील दोन्ही संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार – 2022 या पुरस्कारासाठी शिक्षण व सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा लेखी प्रस्ताव दि. 15 नोव्हेंबर, 2022 पर्यंत 9822472109 या व्हाट्सअपच्या नंबरवर किंवा प्रागतिक लेखक संघ, निर्मिती विचारमंच, कोल्हापूर, आदित्य सभागृह, तळमजला, 873, क/2, सी वॉर्ड, सिध्दीश्री प्लाझा, राजाराम रोड,उमा टॉकीज चौक जवळ, सिद्धिविनायक मंदिरासमोर, कोल्हापूर – 416002 पत्यावर पाठवून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शिक्षण क्षेत्रातील कोणतीही भारतीय नागरिक असणारी व्यक्ती आपला प्रस्ताव या पुरस्कारासाठी पाठवू शकते. यासाठी जाती-धर्माचे कोणतेही बंधन नाही. प्रस्तावासोबत आयडेंटिटी साईज फोटोसह बायोडाटाही पाठवावा. पुरस्कार वितरण समारंभ 28 नोव्हेंबर, 2022 रोजी कोल्हापूरमध्ये आयोजित केला जाणार असून कोल्हापुरी फेटा, सन्मानचिन्ह आणि पाच हजार रुपयांची पुस्तके असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

प्रागतिक लेखक संघ, महाराष्ट्र राज्य समन्वय समितीचे
अध्यक्ष : सिध्दार्थ कांबळे, कार्याध्यक्ष : डॉ. नंदकुमार गोंधळी व चंद्रकांत सावंत, उपाध्यक्ष : प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे, शेषराव नेवारे, प्रा. श्रीकृष्ण अडसूळ, डॉ. सोमनाथ कदम, डॉ. पद्माकर तामगाडगे, सुरेश केसरकर, मोहन मिणचेकर, आचार्य अमित मेधावी, सचिव : रंजना सानप, सहसचिव : डॉ. शोभा चाळके, सदस्य : उद्धव पाटील, डॉ. स्वप्निल बुचडे, डॉ. अविनाश वर्धन, संस्थापक अध्यक्ष : अनिल म्हमाने यांच्यासह ॲड. करुणा विमल, डॉ. दयानंद ठाणेकर आदींच्या पर्यंतनातू राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार – 2022 चे आयोजन करण्यात आले आहे.