शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी संतोषी सूत्रपवार हिची राज्यस्तरीय युवा संसद करिता निवड

28

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.5नोव्हेंबर):– नेहरू युवा केंद्र संघटन आणि युनिसेफ महाराष्ट्र आयोजित राज्यस्तरीय युवा संसद 2022 करिता गडचिरोली जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून संतोषी सूत्रपवार हिची निवड झाली आहे. संतोषी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली येथील स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील तृतीय वर्षाची विद्यार्थीनी असून ती उत्तम वक्ता आहे. अनेक ठिकाणी ती समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमात वक्ता म्हणून बोलत असते. आज पर्यंत तिने अनेक वक्तृत्व, वादविवाद स्पर्धेत सहभाग घेऊन क्रमांक देखील पटकावले आहे.

14 आणि 15 नोव्हेंबर रोजी मुंबई येते होणाऱ्या युवा संसद च्या अधिवेशनात ती खासदार म्हणून भूमिका बजावणार असून जिल्ह्यातील अनेक समस्यांना या अधिवेशनात लावून धरणार असल्याचे संतोषी सूत्रपवार हिने सांगितले आहे. तिच्या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक केले जात असून या निवडीचे श्रेय नेहरू युवा केंद्र गडचिरोली चे जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे, महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, आई- वडील आणि संपूर्ण मित्रपरिवाराला दिले आहे.