डॉ.रामविलास लड्डा “योगविर पुरस्कार “ने सन्मानित

29

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

परभणी(दि.6नोव्हेंबर):- अखिल भारतीय महासंघ पुरस्कृत राष्ट्रीय योगविर सन्मान 2022 चे आयोजन 09 नोव्हेंबर
2022 ला दिल्ली येथे लाजपत भवन ऑडिटोरियम येथे आयोजित केला आहे.सदरील कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महासंघाचे संस्थापक योगगुरू मंगेश त्रिवेदी ,केंद्रीय आयुष राज्यमंत्री डॉ.मुजपरा महेंद्रभाई कालुभाई ,शहरी विकास मंत्री कौशल किशोर,नॅशनल इनस्टिट्यूट ऑफ योग चे डायरेक्टर डॉ ईश्वर बी बसवारेड्डी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

सदरील कार्यक्रम मुख्यतः कोविड काळात इमुनिटी बुस्टर ऑनलाइन योगाभ्यास कार्यक्रम,51 लाख सूर्यनमस्कार,71 लाख सामूहिक सूर्यनमस्कार अभ्यास कार्यक्रम,21 लाख शालेय विद्यार्थ्यांना योगाभ्यास,75 लाख हृदय रोगी रुग्णासाठी कार्यक्रम व योगातील विविध कार्यक्रमातील योगदान,नियमित निशुल्क योगवर्ग यांची नोंद घेऊन वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख ,संत जनाबाई महाविद्यालय गंगाखेड व योगसाधना केंद्र,परभणी चे सचिव प्रा.डॉ.रामविलास लड्डा याना योगविर पुरस्कार ने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांच्या या यशाबद्दल संत जनाबाई महाविद्यालया चे सर्व संचालक, सहकारी प्राध्यापक, परभणी योगसाधना केंद्राचे सर्व सहकारी, मित्रपरिवार, विद्यार्थी या सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.