गोंडपिपरी तालुक्यातील काही कर्मचाऱ्यांचा चालतोय मुजोरपणा

37

🔺तहसील कार्यालय, एस. डी. ओ कार्यालय व भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा.

🔺”सामान्यांचे ऐका व्यथा,नाही तर खुर्ची वरून हटा”

✒️नितीन रामटेके (गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी)
मो:-8698648634

गोंडपिपरी(9जुलै):- तालुक्यातील तहसील कार्यालय, एस. डी. ओ कार्यालय व भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा दिसून येत आहे. कोणतेही काम बिना पैश्याने करायला गेल्यास 1 महिन्याचे काम 1 वर्ष लागतात. अश्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गेल्यास त्यांनीही त्यांचीच बाजू घेतात.मग अश्या वेळेस या मुजोर अधिकाऱ्यांना सरळ कोण करणार हा प्रश्न सामान्यांना पडला आहे. तहसील कार्यालयात तहसीलदार मॅडम कडे विचारणा केल्यास त्या सरळ मला नाही करायचे म्हणतात, भूमी अभिलेख विभागात कर्मचारी कमी म्हणून टाळाटाळ करतात, आणि एस. डी. ओ.कार्यालयात तर आपल्याच कर्मचाऱ्याला शिवीगाळ करतात. असाच एक अनुभव मला आला आहे. मी स्वतः एक शेतीचे काम घेऊन दीड ते दोन वर्ष झाले इकडून तिकडे फिरत आहे. तहसीलदार मॅडम म्हणतात मी नाही करत भूमी अभिलेख विभागात जा, भूमी अभिलेख विभाग म्हणतात की हे तहसिलचे काम आहे तिथेच जा, मग यांच्या वरचे ऑफिस म्हणून एस. डी. ओ ऑफिस मध्ये गेलो तिथे तर यांच्यापेक्षा पेक्षा वरचढ दिसले. तिथं वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेले निकोरे यांनी चक्क तिथेच कार्यरत असलेले अपंग चपराशी यांना शुल्लक कारणावरून खूप शिवीगाळ केल्या. सामान्य माणूस गेला तर टाळाटाळ आणि पैसेवाले गेले तर न होण्याचे काम होतात. आम्हाला कुणाचे उपकार नको, आमचा हक्क हवा आहे. आम्ही जायचं तरी कुणाकडे, मी स्वतः पत्रकार असून मला एवढं त्रास तर सामान्य माणसाला किती त्रास होत असेल. सामान्य माणसाचे एकच म्हणणे आहे, सामान्यांचे ऐका व्यथा,
नाही तर खुर्ची वरून हटा. याच्यावर गोंडपिपरीचे उपविभागीय अधिकारी डहाळे सर व चंद्रपूर चे जिल्हाधिकाऱ्यांनी श्री. डॉ. खेमणार सर यांनी लक्ष देऊन पाहणी करावी. पुरावा पाहिजे असल्यास मी द्यायला तयार आहे. तसेच माझे काम कोण करणार याचा निर्णय घेऊन माझे काम करून द्यावे.