लीला पुनावाला फाउंडेशन (एलपीएफ) तर्फे पदवी आणि  पदव्युत्तर शिष्यवृत्तिसाठी अर्ज करण्याचे आवाहन- गरजू तरुणींसाठी, गुणवत्ता व गरजेवर आधारित शिष्यवृत्ती मिळवण्याची संधी

91

✒️पुणे(पुरोगामी न्युज नेटवर्क)

पुणे(दि10नोव्हेंबर):- अभियांत्रिकी, फार्मसी व नर्सिंगमध्ये पदवी आणि विज्ञान, माहिती तंत्रज्ञान, फार्मसी आणि नर्सिंग मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या तरुणींसाठी आनंदाची बातमी आहे. लीला पुनावाला फाउंडेशन (एलपीएफ) ने आर्थिकदृष्ट्या वंचित पार्श्वभूमीतील परंतु शैक्षणिकदृष्ट्या होतकरू तरुणींना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आणि संपूर्ण अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ति मिळवण्याचे आवाहन केले आहे.

गेल्या २७ वर्षांमध्ये एलपीएफ ने महाराष्ट्रातील पुणे, वर्धा, अमरावती जिल्हा आणि नागपूर शहर, तेलंगणातील हैदराबाद आणि कर्नाटक राज्यातील बेंगळुरूमधील १२,५०० हून अधिक मुलींना व तरुणींना शिष्यवृत्ती दिली आहे सोबतच त्यांच्यासाठी आवश्यक अश्या कौशल्य विकास कार्यक्रमांचे देखील आयोजन केले आहे.

एलपीएफच्या मदतीने आज हजारोहून अधिक मुली आणि युवा तरुणी नामांकित संस्थांसोबत कार्यरत आहेत, चांगले करिअर करत आहेत आणि सोबतच त्यांच्या कुटुंबांना आणि अनुषंगाने समाजास देखील पाठिंबा देत आहेत. या शिक्षित मुली आणि तरुणी देशाच्या आणि पर्यावरण पुरक जगाच्या आर्थिक वाढीसाठी योगदान देण्यात सक्षम आहेत.

एलपीएफच्या या शैक्षणिक मदतीमुळे, प्रयत्नांमुळे या मुली आणि तरुणींच्या शिक्षणाला चालना मिळते सोबतच समाजात खऱ्या अर्थाने परिवर्तन होत आहे.

एलपीएफ २०२२-२०२३ या वर्षासाठी पुणे जिल्ह्यातील महाविद्यालये/विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतलेल्या होतकरू आणि आर्थिकदृष्ट्या वंचित भारतीय तरुणी उमेदवारांकडून ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्ज मागवत आहे.

बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग (४ वर्षे), बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग डिप्लोमा नंतर (३ वर्षे), बॅचलर ऑफ सायंन्स इन नर्सिंग (४ वर्षे), बॅचलर ऑफ फार्मसी (4 वर्षे) आणि पदव्युत्तर (2 वर्षे) मधील कोणत्याही आभ्यासक्रमासाठी जसे की मॅथेमॅटिक्स , एनालिटिकल केमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, स्टॅस्टेस्टीक, इन्फॉर्मेशन टेक्नॉलजी, कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर एप्लीकेशन, फार्मर्सी आणि नर्सींग या अभ्यासक्रमांसाठी गरजू आणि इच्छुक तरुणी अर्ज करू शकतात.

गुणवंत आणि गरजू तरूणी अर्ज करू शकतात, त्वरा करा पदव्युत्तर, शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ नोव्हेंबर २०२२ आहे.

अर्ज करण्यासाठी पात्रता निकष असलेले शिष्यवृत्ती अर्ज पुढील लिंकवर उपलब्ध आहेत: https://www.lpfscholarship.com

अधिक तपशिलांसाठी, कृपया कु. अस्मिता शिंदे/ कु. माधुरी नलवडे यांच्याशी एलपीएफ ऑफिसच्या लँडलाइनवर ०२० – २७२२४२६४ / ६५ किंवा मोबाइल नंबरवर ८६६९९९८९८१

संपर्क साधा किंवा ईमेल :  lpfpunescholarship@lilapoonawallafoundaiton.com     वर देखील संपर्क करता येईल.

(संपर्काची वेळ: सोमवार ते शनिवार सकाळी ११:०० ते दुपारी ४वाजता) अधिक जाणून घेण्यासाठी कृपया एलपीएफच्या वेबसाइट https://www.lilapoonawallafoundation.com ला भेट द्या. त्वरा कर! ही सुवर्णसंधी चुकवू नका! फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह तत्त्वावर मर्यादित ऑनलाइन अर्ज उपलब्ध आहेत.