व्याजदर कमी केल्याचा विरोधकांना पोटशूळ का ? : सिद्धेश्वर पुस्तके

32

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

🔸शिक्षक बँक निवडणुकीत संघाचा विजय निश्चित

म्हसवड(दि.11नोव्हेंबर):-विद्यमान संचालक मंडळाने तब्बल चौदा वेळा विविध कर्जांचे व्याजदर कमी केले. पण ज्या ज्या वेळी व्याजदर कमी करण्याचा निर्णय आम्ही घेतला, त्या त्यावेळी विरोधकांनी अशा निर्णयामुळे बँक तोट्यात जाईल असा कांगावा केला. याचा अर्थ यांच्या ताब्यात बँक गेली तर ते व्याजदर वाढवणार आहेत. व्याजदर कमी केल्याचा विरोधकांना पोटशूळ नक्की का आहे ? असा प्रश्न सभासद विकास पॅनलचे मार्गदर्शक नेते सिद्धेश्वर पुस्तके यांनी केला.

स्व. आ. शिवाजीराव पाटील प्रणित सभासद विकास पॅनलचे म्हसवड गटाचे उमेदवार राजाराम तोरणे यांच्या प्रचार कार्यालयास सिद्धेश्वर पुस्तके यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की एन. पी. एस. धारक शिक्षकांना आकस्मित मृत्यू पश्चात पंचवीस लाख रुपयापर्यंत मदत करण्याची तरतूद केल्यामुळे जुनी पेन्शन, शिक्षक भारती यासारख्या तरुणांच्या संघटना आपल्या सोबत आहेत, त्यामुळेच आपला विजय निश्चित आहे.

यावेळी शिक्षक संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष नरळे, तालुका सर चिटणीस सुभाष गोंजारी, शिक्षक भारतीचे नेते रमेश शिंदे, शहाजी खांडेकर नगरपालिका शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष लघू जाधव जेष्ठ नेते सुभाष शेटे, ज. लि. विरकर, संचालक आर. डी. खाडे व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. प्रस्ताविक सुनिल डोंगरे यांनी केले तर आभार सुभाष गोंजारी यांनी मानले.