पॅसिफिका.3234 कपाशी वानावर पीक पाहणी कार्यक्रम संपन्न…

30

✒️मशेखर बडगे(विशेष प्रतिनिधी)मो:-9545619905

अमरावती(दि.14नोव्हेंबर):- तालुक्यातील देवरी देवरा या गावी प्रगतिशील शेतकरी श्री रावसाहेबजी राऊत यांच्या शेतावर पॅसिफिका कॉप ब्रिडर्स प्रायव्हेट लिमिटेड या संस्थे कडून दिनांक 13 नोव्हेंबर रोजी पीक पाहणी कार्यक्रम आयोजित केलेला होता त्याप्रसंगी पंचक्रोशीतील वीस ते पंचवीस गावांमधील शेतकरी उपस्थित होते, ती पाहणी करत असताना या वनाचे प्रमुख वैशिष्ट्य सर्वाधिक हिरवेगार राहणारे झाड, झाडाला 80 ते 90 बोंडे 40 ते 50 पाते आणि काही फुलं यांचा समावेश असून असेही बिकट परिस्थितीमध्ये सर्वाधिक उत्कृष्ट असे कपाशी वाण आहे असे सदरील शेतकऱ्यांनी पाहणी दरम्यान म्हणून दाखवले.

याप्रसंगी श्री अरुण भाऊ कडू बडनेरा, कमलेश भाऊ तायडे जिल्हा सचिव राष्ट्रवादी काँग्रेस अमरावती, माजी सरपंच किशोर भाऊ बडगे देवरी, गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक तसेच यावली येथील शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री अतुल भाऊ ढोक यांनी सदरील वाणाची पाहणी केली असता सर्वाधिक पसंती ही कपाशी पॅसिफिक 3234 या वानाला पसंती दाखवली..

सदरील कार्यक्रमाप्रसंगी शेतकऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला श्री रावसाहेब राऊत हे प्रगतिशील शेतकरी असून त्यांचेमनोगत ऐकले असता त्यांनी एकरी 20 ते 25 क्विंटल उत्पादन होईल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली त्याप्रसंगी गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिकांनी या वाना प्रति समाधान व्यक्त केले असून येणाऱ्या काळामध्ये सेवान शतकासाठी वरदान ठरेल असे मत व्यक्त केले आहे त्याप्रसंगी संस्थेच्या वतीने श्री शेखर बडगे क्षत्रिय व्यवस्थापक यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.