श्री संत नगाजी नाभिक महिला मंडळ घुग्घुसतर्फे श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव साजरा

12

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.13नोव्हेंबर):- घुग्घुस येथील श्री संत नगाजी नाभिक महिला मंडळातर्फे शनिवारी, १२ नोव्हेंबर रोजी श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन संत गाडगे बाबा मंदिर, तुकडोजी नगर वार्ड क्र.६, जनता कॉलेज जवळ घुग्घुस येथे करण्यात आले होते.

याप्रसंगी श्री संत नगाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. सत्कार मूर्ती सरोजताई चांदेकर यांच्या प्रवचनाचा व कीर्तनचा कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र हनुमंते अध्यक्ष विदर्भ नाभिक महामंडळ, प्रमुख पाहुणे म्हणून भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, चंद्रपूर यंग चांदा ब्रिगेडचे नेते विलास वनकर, चिंतामणी मांडवकर जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय जनसेवा पक्ष, सरोज चांदेकर, अल्का वाटकर, पांडुरंग जुनारकर, मधुकर मालेकर, साजन गोहने, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र भानोसे मंचावर उपस्थित होते.

नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच कोरोना काळातील उत्कृष्ट कार्याबद्दल भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार मूर्ती सरोजताई चांदेकर यांच्या प्रवचनाचा व कीर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला.प्रास्ताविक विजय गौरकार यांनी केले. महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.संचालन शंकर नागपुरे यांनी केले तर आभार राहूल गौरकार यांनी केले.

या वेळी मार्गदर्शक कार्यकारी मंडळ म्हणून अध्यक्ष – श्री.विलास वाटेकर, उपाध्यक्ष -श्री. संतोष अतकर, सचिव -श्री. रवी हनुमंते कोषाध्यक्ष -श्री. विठ्ठल गौरकार सहसचिव -श्री. रवींद्र कविटकर संघटक -श्री. गणेश घुमे सदस्य – अभय नागतुरे, अंबादास चौधरी, सचिन नागतुरे, श्यामसुंदर जुनारकर, दशरथ चौधरी, सुरेश गौरकार, कवडू गौरकार, विनोद नक्षीने, सुरेश नक्षीने, पुंडलिक गौरकार, मनहोर अतकारे, रमेश जुनारकर व नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी संत नगाजी नाभिक महिला मंडळाच्या अध्यक्षा बेबीताई नागतुरे, उपाध्यक्ष रुंदाताई हनुमंते, सचिव पुष्पाताई नक्षीने,अमोल थेरे, राजेश मोरपाका व समाज बांधव उपस्थित होते.