महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत- जिथे १८ वर्षाखालील मुलांना मोबाईल बंदी

92

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.15नोव्हेंबर):-तालुक्यातील ग्रामपंचायत बान्सी येथे दिनांक ११ नोव्हेंबर २०२२ रोजी ग्रामसभा पार पडली .व या ग्रामसभेत महत्वपुर्ण असे निर्णय घेतले त्यामध्ये १) १८ वर्षाखालील मुलांना मोबाईल बंदी २) १००% कर भरणार्या नागरिकांसाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना लागु करणे ३) निराधार लोकांसाठी वृद्धाश्रम ही संकल्पना राबविनणेअसे तीनही ऐतिहासिक निर्णय या ग्रामसभेने घेतले आणि सर्व समाजासमोर एक आदर्श निर्माण केला.

आताच्या आधुनिक काळामध्ये तरुनांना मोबाईलने वेड लावल्याचे आपल्याला दिसुन येते मोबाईलचे अनेक फायदे /तोटे आहेत .परंतु सध्याच्या काळात जास्त तोटेच आपल्याला दिसत आहे अनेक तरुण मुल आज आपल्याला मोबाईलचा वाईट वापर करताना दिसतात त्या मुलांना चांगल वाईट या गोष्टीची अजुन समज आली नाही परंतु मोबाईल मात्र त्यांच्या हाती आला पालकांना वाटते मुलांना आँनलाईन शिक्षण यावर मिळते परंतु या आँनलाईन शिक्षणाचे तीन-तेरा वाजलेले आपल्याला पहायला मिळते अनेक मुंलाना या मोबाईलमुळे गेम्स , वाईट साईट पाहण्याचे व्यसन लागलेले आपल्याला दिसुन येते.मोबाईलचे असे अनेक दुष्परीणाम पाहता ग्रामसभेने हा मोबाईल बंदीचा निर्णय घेतला .

या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी युवा सरपंच गजानन टाले हे होते .तसेच उपसरपंच रेखा राठोड , सचिव पि.आर.आडे, ग्रामपंचायतचे सदस्य संतोष आगलावे , अभय ढोणे , माधव डोंगरे , इंदु तांबारे , शोभा आगलावे , मंगल शर्मा , सुनिता लथाड , पंकज बुरकुले,जि.प मराठी शाळेचे मुख्याध्यापक,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त यशवंत देशमुख , आरोग्य उपकेंद्राचे सामुदायिक विकास अधिकारी डाँ .गोरमाळी तसेच लाईनमन भालेराव , जुगलकिशोर शर्मा व ग्रा.पं. सदस्य,ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी वृंद व प्रतिष्ठत नागरिक आणि गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.