गंगाबाई तलमले महाविद्यालयात अल्कोहॉलिक्स अनानिमस च्या वतीने जनजागृती सभा

42

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि. 17नोव्हेंबर):-ब्रम्हपुरी परिसर आंतरसमूह आणि सेवा समूह ब्रम्हपुरी च्या संयुक्त विद्यमाने गंगाबाई महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे मद्यपाश् एक महाभयंकर आजार या विषयावर जनजागृती सभा घेण्यात आली. सदर कार्यक्रमात मोठया संख्येने विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते. अल्कोहॉलिक्स अनानिमस हया विश्वव्यापी संघटनेचे सभासदांनी आपल्या अनुभवातून मद्यपाश् एक आजार कसा वाढत जातो तसेच कुटुंबाची दुरवस्था कशी होते हे अनुभवातून सांगितले. सेवा समूह ब्रम्हपुरी सभासदांनी एक दिवसाच्या आधारे यावर उपाययोजना सांगण्यात आले.

सभासदांनी विद्यार्थी असताना दारू चा प्रवास कसा सुरू आणि त्याचे वेक्तीगत जीवनावर कसा परिणाम पडला हे विद्यार्थ्यांना अनुभवातून पटवून सांगण्यात आले.विद्यार्थ्यांनी आपले मित्र,नातलग याना या सघटनेचा मार्ग दाखवावा तसेच विद्यार्थ्यांना भावी काळात जर ही समस्या उदभवली तर त्यांना हया संघटनेची आठवण राहावी या अनुशंगाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सदर कार्यक्रम कसा आध्यत्मिक आहे हया वर जोर देण्यात आला. महाविद्यालयीन मुली लग्न झाल्यावर जर जोडीदार मद्यपी मिळाला तर त्यातून जोडीदाराला कसे बाहेर काढता येईल ही समज सुद्धा हया जनजागृती कार्यक्रमातून मिळाली.राष्ट्रीय सेवा योजने च्या वतीने सुद्धा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य करण्यात आले.यावेळी महाविद्यालयातील प्रा. मैंद सर, प्रा.नंदेश्वर सर, प्रा.चोले सर प्रा.स्मिता मॅडम आणि प्रा. तृप्ती मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.सर्व कार्यक्रमात विद्यार्थी ,विद्यार्थीनी आणि सर्व कर्मचारी उपस्थित भावविभोर झाले होते. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने झाली.