अखेर कोर्ट इमारतीच्या पायाभुत कामांना मिळाली मंजुरी

17

🔹आ.डॉ.गुट्टेंच्या प्रयत्नांना यश : पालमकर आनंदले

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.18नोव्हेंबर):-तालुका न्यायालयास मोठी इमारत उपलब्ध आहे. परंतु पायाभुत सुविधांची वणवा जाणवत होती. शहरासह तालुक्यातील तब्बल ८७ गावातील नागरिकांना तसेच वकील व न्यायालयीन कर्मचारी यांना वाहाने उभी करण्यासाठी सुविधा उपलब्ध नव्हती. तसेच इतर काही पायाभुत सुविधांची न्यायालयास गरज असल्याचे लक्षात घेऊन कार्यसम्राट आ.डॅ.रत्नाकर गुट्टे यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला होता. त्यानुसार न्यायालय इमारतीच्या परिसरात संरक्षक भिंत, वाहनतळ, ध्वजस्तंभ, बाग-बगीचा, सुरक्षारक्षक चौकी, बाह्य विद्युतकरण अशा विविध कामांसाठी नुकतीच मंजुरी मिळाली आहे.

त्यानुसार अनुक्रमे रु.२,२०,६२,००० आणि उर्वरित कामासाठी रु.७४,०२,००० असा एकूण २,९४,६४,००० निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे लवकरच कामांची पायाभरणी होणार असल्याचे सांगितले जात आहे. न्यायालय इमारतीच्या परिसरात उभारण्यात येणा-या पायाभुत सुविधांमुळे सुरक्षेचा प्रश्न मिटणार असून परिसराचा कायापालट सुध्दा होणार आहे.

तालुका न्यायालयात पायाभुत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गंगाखेड विधानसभेचे कार्यसम्राट आ.डॉ.रत्नाकर गुट्टे हे गेली अनेक महिने प्रयत्नशील होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने सदरील कामास अंतिम मंजुरी मिळाली आहे. त्या संदर्भातली अंतिम मंजुरी पत्रे नुकतीच आ.डॉ.गुट्टे यांच्या कार्यालयास प्राप्त झाली आहेत. त्यामुळे न्यायालयीन इमारतीचा कायापालट होण्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, यशस्वी पाठपुरावा करून न्यायालयीन पायाभुत सुविधांचा प्रश्न मार्गी निकाली काढल्यामुळे पालम शहरासह तालुक्यातील नागरिक आ.डॉ.गुट्टे यांचे अभिनंदन करीत आहेत.