बामसेफ जिल्हा युनिटच्या वतीने संविधान दिना निमित्त प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन

112

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.24नोव्हेंबर):-बामसेफ जिल्हा युनिटच्या वतीने समताधिष्ठित समाज व्यवस्था आणि भारतीय संविधान या विषयावर प्रबोधन पर व्याख्यान होणार असून व्याख्याते म्हणून संविधान आभ्यासक नितीन महाविद्यालय पाथरी येथील प्रा. डॉ.आनंद इंजेगावकर सर सखोल मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी इंसाफ संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा.एम.बी. गोटमुकले परभणी यांची उपस्थिती लाभणार आहे त्यामुळे सर्व फुलेचे आंबेडकरवादी अनुयायी यांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. सविधान दिन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तहसील कार्यालय गंगाखेड येथील नायब तहसीलदार मा.सुनील कांबळे साहेब यांची उपस्थिती राहणार आहे.

सावरकर का नाम बदल दो, विनायक से वीर कर दो!

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मा.नितिन वाकळे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य बामसेफ माननीय डी.जी. वाळवंटे राज्य महासचिव इन्साफ हे उपस्थित राहणार आहेत. २६ नोव्हेंबर शनिवार दु.०२:०० वा.संत जनाबाई महाविद्यालय गंगाखेड तरी बहुजन समाजातील सर्व बुद्धिजीवी बांधवांनी सामाजिक बांधिलकी समजून कार्यक्रमास सहभागी व्हावे. असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.

https://www.purogamiekta.in/2022/11/24/55834/

https://www.purogamiekta.in/2022/11/23/55808/