रनिंग व हाय जम्प मध्ये गुड शेपर्ड स्कुल जिल्हास्तरावर ..

36

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि. 25नोव्हेंबर):-येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलच्या मेहुल कोठारी (उंच उडी) व विनय पाटील (धावणे) यांनी तालुकास्तरावर विजय संपादन करून जिल्हास्तरावर मजल मारली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, काल लिटल ब्लॉझम स्कुल येथे झालेल्या तालुकास्तरिय अँथलेटिक्स स्पर्धेत गुड शेपर्ड स्कुलच्या अंडर १४ गटात मेहुल आशिष कोठारी या विद्यार्थाने उंच उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक तसेच अंडर १७ गटात विनय शांतीलाल पाटील या विद्यार्थाने ८०० मी. धावण्याच्या शर्यतीत द्वितीय क्रमांक संपादन करत जिल्हास्तरावर मजल मारली.

आज शाळेच्या वतीने क्रीडा शिक्षक अमोल सोनार यांचा शाखा व्यवस्थापक जगन गावित यांच्या हस्ते तसेच मेहुल कोठारी व विनय पाटील यांचा प्राचार्या चैताली रावतोळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कार प्रसंगी दर्शना सरला अरुण पवार लिखित न्याय स्वराज्याच्या संकल्पिका राजमाता जिजाऊ हा ग्रंथ आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी क्रीडा शिक्षक अमोल सोनार यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन करत त्यांच्या लढाऊ वृत्तीचे कौतुक केले. याप्रसंगी गुड शेपर्ड परिवाराने यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले आणि त्यांना जिल्हास्तरीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

https://www.purogamiekta.in/2022/11/25/55882/

कार्यक्रमाला शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित, मुख्याध्यापिका नाजनिन शेख यांच्यासह जेष्ठ शिक्षिका भारती तिवारी, अनुराधा भावे, स्वाती भावे, रमिला गावित, हर्षाली पुरभे, पूनम कासार, शिरीन खाटीक, ग्रीष्मा पाटील, नाजुका भदाणे, गायत्री सोनवणे, सपना पाटील, पुष्पलता भदाणे, लक्ष्मण पाटील, अमोल सोनार, सागर गायकवाड हे सर्व शिक्षकवृंद तसेच सरला पाटील, शितल सोनवणे, इंद्रसिंग पावरा, अमोल पवार हे शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी – विद्यार्थीनी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सागर गायकवाड यांनी केले.

आबादी की चिंता की आड़ में सांप्रदायिक राजनीति!

चला भारतीय संविधान समजून घेवूया!